विनातिकीट प्रवाशांकडून 45 कोटींची दंडवसुली - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

विनातिकीट प्रवाशांकडून 45 कोटींची दंडवसुली

Share This
मुंबई - एप्रिल ते जून 2015 या कालावधीत मध्य रेल्वेने आठ लाख 17 हजार विनातिकीट प्रवाशांकडून 44 कोटी 87 लाख रुपये एवढा विक्रमी दंड वसूल केला आहे. गेल्या वर्षी या कालावधीत सहा लाख 29 हजार विनातिकीट प्रवाशांकडून 32 कोटी 56 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला होता. दुसऱ्याच्या नावावर आरक्षित करण्यात आलेल्या तिकिटावर प्रवास करणाऱ्या 405 प्रवाशांना जूनमध्ये पकडण्यात आले. त्यांच्याकडून तीन लाख 12 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages