लेप्टोपायरेसिसने मृत्यूमुखी पडलेल्यांना आर्थीक मदतीची मागणी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

लेप्टोपायरेसिसने मृत्यूमुखी पडलेल्यांना आर्थीक मदतीची मागणी

Share This

मुंबई / प्रतिनिधी 
लेप्टोपायरेसिस रोगामुळे मुंबईत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. दारूकांड, बॉम्बब्लास्ट या मुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना शासन आर्थिक मदत करते. त्याच धर्तीवर मुंबईमध्ये लेप्टोपायरेसिस किंवा इतर आजारांनी मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांनाही आर्थिक देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी पक्षाच्या सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केली आहे. 

मुंबईत आतापर्यंत लेप्टोपायरेसिसने १४ जणांचा मृत्यू झाला आहे. लेप्टोपायरेसिसच्या साथीमुळे मुंबईकर नागरिकांमध्ये घबराट पसरली असून पालीका प्रशासनाने या लेप्टोपायरेसिसबाबत योग्य ती माहिती दिली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांचं नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पालिका अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांच्याकडे केली. 
 
लेप्टोपायरेसिस हा रोग नेमका कशामुळे होतो त्यावर उपचारासाठी प्रशासनाने काय व्यवस्था केली आहे याबाबत खुलासा करण्याची मागणी केली.साथीच्या रोगांसाठी ज्याप्रमाणे पालिका वैद्यकीय शिबिरे लावते त्याप्रमाणे पालिकेने आताही शिबिरे लावावीत. त्यासाठी सामाजिक संस्था किंवा राजकीय पक्षांवर अवलंबून राहू नये. मुंबई महानगरपालिकेची शहरात कस्तुरबा रुग्णालयात विविध साथींच्या चाचणीसाठी ज्याप्रमाणे टेस्टल्याब (प्रयोगशाळा) आहे त्यापद्धतीने उपनगरातही टेस्टल्याब सुरु करण्याची अहिर यांनी केली. यावर याबाबत सकारात्मक विचार सुरु असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages