म्हाडाच्या परिसर परिचयला आयसीई पुरस्कार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

म्हाडाच्या परिसर परिचयला आयसीई पुरस्कार

Share This

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाची गृहपत्रिका 'परिसर परिचय'ला आयसीई अर्थात इनहाऊस कम्युनिकेशन एक्सलेन्स पुरस्कार प्राप्त झाला आहे. शैलजा नायर फाऊंडेशनतर्फे एकूण १00 गृहपत्रिकांमध्ये सर्वाधिक प्रशंसनीय गृहपत्रिका म्हणून निवडकर्त्यांनी म्हाडाच्या गृहपत्रिकेची निवड केली. 

म्हाडाच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली संदानसिंग या गृहपत्रिकेच्या संपादक आहेत. १९८७ मध्ये या गृहपत्रिकेला प्रारंभ झाला. 'परिसर परिचय' हे केवळ बातमीपत्र न राहता या गृहपत्रिकेने कर्मचार्‍यांच्या सर्वांगीण विकासाला हातभार लावण्याचे त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारून त्यांना कार्याभिमुख करण्याचे काम केले आहे. कर्मचार्‍यांच्या कलागुणांना व्यापक प्रमाणात व्यासपीठ मिळवून देण्यासाठी वेगवेगळय़ा सदरांची जाणीवपूर्वक निवड करून हे माध्यम वैचारिकदृष्ट्या सबळ, सशक्त, सकस करण्याचे काम या गृहपत्रिकेने केले आहे. सुरुवातीला कृष्ण धवल असणार्‍या या गृहपत्रिकेची सर्व पाने सन २000 मध्ये रंगीत करण्यात आली. संस्थेतील विविध घडामोडींची माहिती गृहपत्रिकेत देऊन अधिकारी व कर्मचार्‍यांच्या मनात संस्थेविषयी सकारात्मक भावना जागृत ठेवण्याचे मोलाचे काम या गृहपत्रिकेच्या माध्यमातून होत आहे. औरंगाबाद येथे सन १९९६ मध्ये झालेल्या कामगार साहित्य संमेलनात राज्यस्तरीय गृहपत्रिका स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत म्हाडाच्या गृहपत्रिकेला तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages