जकात माफियांविरोधात अखेर फिर्याद दाखल . - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

जकात माफियांविरोधात अखेर फिर्याद दाखल .

Share This

 ३५ ते ४७ अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल 
***  काचेवर 'नगरसेविका'  लिहिलेली ती गाडी कोणाची ??? 
मुंबई / १०  जुलै २०१५ / रशिद इनामदार 
मानखुर्द जकात नाक्यावरील अधिकारी माफियांच्या दहशतीखाली आहेत . २५ जून ला जकात न भरता ३ कंटेनर पळवून नेण्यात आले होते. त्यातील एक कंटेनर विनोबा भावे नगर पोलिसांनी पकडून जकात अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिला होता. मात्र जकात अधिकारी या घटनेची तक्रार मानखुर्द पोलिस ठाण्यात नोंदवू शकले नव्हते. वृत्तपत्रांमध्ये आलेल्या वृत्तांमुळे या प्रकरणाची दखल  पोलिस उपायुक्त संग्रामसिंग निशानदार यांनी घेतली.  मानखुर्द पोलिसांना ताबडतोब तक्रार नोंद करून  चौकशीचे आदेश ही दिले. मानखुर्द पोलिसांनी जकात अधिकाऱ्यांना दोन तीन वेळा पत्र पाठवून चौकशीसाठी बोलावले. तरीही ते जकात माफियांच्या दहशतीमुळे तक्रार देण्यासाठी टाळाटाळ करत होते. अखेरीस ८ जून च्या संध्याकाळी जकात अधिकारी शेषराव राठोड यांनी जकात माफियांच्या विरोधात मानखुर्द पोलिस ठाण्यात रीतसर फिर्याद केली आहे.

जकात माफियांच्या जकात चोरीप्रकरणी शेषराव राठोड यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. ते व त्यांचे सहकारी सुरेश पवार अरविंद पवार कर्तव्यावर होते.सहायक सुरक्षा अधिकारी देवदास भीमराव बर्वे, कोकणे,चव्हाण, बडवणे, तेटांबे यांच्या मदतीने ते वाहने तपासात होते. त्यांचा समोर दोन कार येउन थांबल्या. त्यातील एका गाडीच्या काचेवर नगरसेविका लिहिलेले होते. त्यातून १२ जण उतरले. त्यांनी जकात नाक्यातील आपल्या ३० साथीदाराना बोलवून या सर्व अधिकाऱ्यांना घेराव घातला. ३ कंटेनर जकात न भारताच भरधाव वेगात मुंबईच्या दिशेने पळवून नेले. त्यांनंतरजकात माफियांचे टोळके निघून गेले. शेषराव राठोड यांच्या सहकाऱ्यांनी मुंबई पोलिस नियंत्रण कक्ष व महापलिका नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. एम एच ०४ इ ९०४७ , एम एच ४३ वाय ९०३ आणि ७७६९ या तीन पळवलेल्या कंटेनर बद्दल माहिती देऊन मदत मागितली. विनोबा भावे नगर पोलिसांना त्यापैकी एम एच ४३ वाय ९०३हा कंटेनर पकडण्यात यश आले होते. तो त्यांनी  जकात अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिला. सध्या तो घाटकोपर येथील महापालिकेच्या यानगृहात उभा आहे. या कंटेनर चा चालक बाबुराव रामदास भोसले यास चौकशीनंतर सोडून देण्यात आले आहे.अद्याप पर्यंत कंटेनर चा मालक किंवा त्यात असलेल्या मालाचा मालक कोणीही आलेले नाही. त्यामुळे त्या कंटेनर मध्ये नक्की काय माल आहे  याची माहिती मिळू शकलेली नाही. 
          
सरकारी कामात अडथळा आणला आणि त्यामुळे ३ कंटेनर जकात न भरताच निघून गेले . बृहन्मुंबई महापालिकेचा महसूल बुडाला म्हणून ३५ ते ४७ जणांविरोधात तक्रार केली आहे. याव्यतिरिक्त तिन्ही कंटेनर च्या चालकांविरोधात व मालाच्या मालाकांविरोधात तक्रार दिली आहे. 
                
काचेवर 'नगरसेविका'  लिहिलेली ती गाडी कोणाची ?
या गुन्ह्यात जकात अधिकाऱ्यांच्या वाहनाला पाठलाग करण्यापासून अडवण्यासाठी समोर दोन कार उभ्या केल्या होत्या. त्यातील एक कार इन्होवा तर दुसरी स्कोर्पियो होती. स्कोर्पियो या कारच्या काचेवर नगरसेविका असे लिहिले होते. ज्या बृहन्मुंबई महापालिकेचं  मीठ खाते आणि तिचाच महसूल बुडवणाऱ्याना मदत करते. अशी ही गद्दार नगरसेविका नक्की कोण ? याची चर्चा होताना दिसत आहे. त्या दोन्ही कार चे क्रमांक  जकात अधिकारी शेषराव राठोड यांनी  तक्रारीमध्ये दिले आहेत. त्या नगरसेविकेचा शोध सुरु आहे .
अशाच  गुन्ह्याप्रकरणी मानखुर्द पोलिस ठाण्यामध्ये दीड वर्षापूर्वी स्थानिक राजकीय पुढार्यांच्या कार्यकरर्त्यांना अटक झाली होती.  एक वाहन ही ताब्यात घेण्यात आले होते.त्यांच्यावर चालकाला मारहाण करून खंडणी मागितल्याचा गुन्हा नोंद झाला होता. त्याच राजकीय पुढाऱ्याला व कार्यकर्त्यांना चेंबूर येथे जकात चोरी प्रकरणी पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अटक केली होती. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages