जेंडर बजेटअंतर्गत यंत्रसामुग्री वितरणाकरीता अर्ज स्वीकारण्यास पालिकेची मुदतवाढ - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

जेंडर बजेटअंतर्गत यंत्रसामुग्री वितरणाकरीता अर्ज स्वीकारण्यास पालिकेची मुदतवाढ

Share This
मुंबई, शुक्रवार (प्रतिनिधी) महापालिकेच्या जेंडर बजेट अंतर्गत सन २०१५ – २०१६ या आर्थिक वर्षाकरीता पात्र महिलांना यंत्रसामुग्री वितरणास पालिकेने मुदतवाढ दिली आहे. 24 जुलै रोजी अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत होती. यामध्ये तीन दिवसाची वाढ केली आहे. त्यामुळे अर्ज भरण्यास इच्छूक महिलांना दिलासा मिळला आहे.

महापालिकेच्या जेंडर बजेटअंतर्गत सन २०१५ – २०१६ या आर्थिक वर्षाकरीता पात्र महिलांना यंत्रसामुग्रीचे वितरण करते. २४ विभाग कार्यालयांतून विनामूल्य अर्ज वितरीत केले जातात. यात पात्र महिलांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह २२ ते २४ जुलै २०१५ या कालावधीत प्रशासनाकडे सादर करण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र, या योजनेला महिलांचा प्रतिसाद वाढल्याने मुदत वाढ देण्यात आली आहे. मात्र, ज्या महिलांनी अर्ज घेतले आहेत. त्याच महिलांना अर्ज भरता येणार आहेत, असे आवाहन महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा संजना मुणगेकर यांच्या आदेशानुसार पालिकेने वाढविण्यात आल्याचे पालिका सहाय्यक आयुक्त (नियोजन) प्राची जांभेकर यांनी सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages