मुंबईमधे पावसाळ्यात पडलेली झाडे अजूनही रस्त्याकडेला पडून - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईमधे पावसाळ्यात पडलेली झाडे अजूनही रस्त्याकडेला पडून

Share This
मुंबई । अजेयकुमार जाधव
मुंबईमध्ये जून महिन्यात पडलेल्या पावसा दरम्यान मोठ्या प्रमाणात झाडे पडली असून हि झाडे अद्याप मुंबई मधील रस्त्यावर आणि रस्त्याच्या कडेला पडून असल्याने पालिकेच्या स्वच्छतेबाबत प्रश्न चिन्ह उभे केले जात आहेत. 

मुंबईत ११ जूनला १३, १३ जूनला ४०, १४ जूनला ४०, १५ जूनला २३, १६ जूनला २७, १७ जूनला २७, १९ जूनला १२३, २० जूनला ८५, २१ जूनला ८९, २२ जूनला ४७, २३ जूनला २४४, २४ जूनला  ४०, २५ जूनला ३३, २८ जूनला ५ तर २९ जून रोजी ६ अशी एकूण ८४२ झाडे पडली आहेत. मुंबई मधील झाडे पडल्यावर पडल्या जागेवरून ही झाडे पालिकेने त्वरित हटवायला हवी होती. परंतू पालिकेकडून पडलेली झाडे रस्त्याच्या कडेला पडून असल्याने मुंबईकर नागरिकांना रस्त्यावर चालण्यास आणि रहदारिस अडचणी निर्माण होत आहेत. रस्त्याच्या कडेला गेल्या २० दिवसा पासून पडलेल्या झाडांचा कचरा पुन्हा गटारात जात असल्याने गटारामधें कचरा जाऊन पुन्हा गटारे तुंबण्याची शक्यता आहे. याबाबत पालिकेच्या उद्यान विभागाचे अधीक्षक हीरे यांच्याशी संपर्क साधला असता ते मीटिंग मधे असल्याचे सांगण्यात आले. या नंतरही वारंवार संपर्क साधुनही हीरे यांच्याशी संपर्क होउ शकलेला नाही.







Post Bottom Ad

JPN NEWS

Pages