भायखळा जिजामाता उद्यानात पर्यटकांची निराशा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

भायखळा जिजामाता उद्यानात पर्यटकांची निराशा

Share This

मुंबई / प्रतिनिधी 
भायखळा येथील (राणी बाग) वीरमाता जिजामाता उद्यानात दूरहून लोक प्राणी-पक्षी पाहण्यासाठी येतात. शाळकरी विद्यार्थी सहलीच्या निमित्ताने वर्षातून एकदा तरी जिजामाता उद्यानाला भेट देत असतात. उत्साहात आलेल्या व्यक्ती व शाळकरी विद्यार्थ्यांना उद्यानात प्रवेश केल्यानंतर प्राण्यांऐवजी केवळ रिकामे पिंज-यांवर समाधान मानावे लागत आहे. त्यामुळे लोकांची प्राणी-पक्षी पाहायला न मिळाल्याने घोर निराशा होत आहे. 
गेल्या पाच वर्षात मुंबईतील जिजामाता उद्यान आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनविण्याचे स्वप्न शिवसेना-भाजपा युतीने दाखविले होते. परंतु, जागतिक दर्जाचे प्राणिसंग्रहालयाचे आंतरराष्ट्रीय होण्याची वाट बघताना प्रत्यक्षात मात्र, या उद्यानाची दुरवस्था रोखण्यास पालिका प्रशासन अपयशी ठरले आहे. या प्राणिसंग्रहालयात १८ जातींचे १७५ प्राणी आहेत. ७ जातींचे ३४ सरपटणारे प्राणी आहेत. तसेच ३८ जातींचे ४९५ पक्षी आहेत, असे प्रशासनातर्फे दिलेल्या आकडेवारीत नमूद करण्यात आले आहे. परंतु, प्रत्यक्षात याउलट परिस्थिती येथे पाहायला मिळते. सध्या प्राणिसंग्रहालयात एक अस्वल, काही हरण, दोन हत्ती, एक नीलगाय, अजगर, दोन पाणघोडे, तीन मगरी तसेच काही पक्षी इतकेच आता उरलेले आहेत. राणीच्या बागेची शान म्हणून ओळखले जाणारे वाघ, सिंह आता दिसेनासेच झाले आहेत. कित्येक ठिकाणचे पिंजरे ओस पडले आहेत. अस्वल, वाघ, सिंह यांचे भकास, दुर्गंधीयुक्त पिंजरे लोकांची मात्र निराशाच करतात. थोडक्यात बागेची अवस्थाही अत्यंत दयनीय झालेली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages