मुंबई । प्रतिनिधी
मुंबईमधे जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच 12 लोकांचा लेप्टोस्पायरेसिस या आजाराने मृत्यू झाले असतानाच गुरुवारी आणखी दोघांचा मृत्यु झाल्याने लेप्टोने मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या आता 14 झाली आहे. गुरुवारी लेप्टोचे 6 नवे रुग्ण आढळ ले असून जुलै महिन्यात आता पर्यन्त 30 रुग्णांची नोंद झाली आहे. मृत्यु झालेले दोन्ही पुरुष असून एक मालाड येथील तर एक रे रोड येथे राहणारा होता. या दोघांचे वय 38 आणि 40 असे आहे.

