इमारत बांधकामांच्या ठिकाणी डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी विशेष आदेश - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

इमारत बांधकामांच्या ठिकाणी डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी विशेष आदेश

Share This

मुंबई / प्रतिनिधी 
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात आरोग्यपूर्ण वातावरण असावे व रोगांच्या प्रसारास कारणीभूत ठरणाऱया बाबींना प्रतिबंध व्हावा यासाठी महापालिका सर्व स्तरावर अव्याहतपणे कार्य करीत आहेयाच प्रयत्नांचा एक भाग म्हणून महापालिका क्षेत्रात बांधकाम सुरु असलेल्या २७४१ प्रस्तावित इमारतींच्या परिसरात पाणी साचण्याची व तेथे डास उत्पत्ती स्थाने निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व संबंधित बांधकाम व्यावसायिकांना महापालिकेच्या कीटक नियंत्रण विभागाद्वारे १० कलमी आदेश देण्यात आले आहेत.


या आदेशामध्ये बांधकाम चालू असलेल्या परिसरात असणाऱया व पाणी साचू शकतील अशा सर्व वस्तूंमध्ये पाणी साचणार नाहीअशी काळजी घेणे व त्यासाठी सदर वस्तू काढणेया वस्तूंमध्ये पत्रेपाण्याचे पिंप (ड्रम्स), शिरस्त्राण (हेल्मेट), घमेलेएम.एसचॅनेल्स (आय बिम्सआय सेक्शनसी सेक्शनयासारख्या पावसाचे पाणी साचून 'मच्छर उत्पत्ती स्थानहोऊ शकतील अशा वस्तूंचा समावेश आहे. कामगारांच्या तात्पुरत्या निवाऱयांवर किंवा बांधकाम परिसरातील इतर ठिकाणी पावसाच्या पाण्यापासून रक्षण होण्यासाठी ताडपत्री किंवा प्लास्टिक लावलेले असल्यासत्यास पाणी वाहून जाण्यासाठी व्यवस्थित उतार असावा व ते वळ्या पडणार नाही अशा रितीने घट्टपणे बांधलेले असावेजेणेकरुन त्यामध्ये पाणी साचून मच्छर उत्पत्ती स्थानाची निर्मिती होणार नाहीबांधकाम परिसरातील कामगारांचा राहण्याचा परिसर (लेबर कॅम्पस्वच्छ व आरोग्यपूर्ण असावाइमारतीच्या बांधकाम परिसरामध्ये तळघर अथवा जमिनीच्या खाली असणाऱया परिसरांमध्ये पावसाचे किंवा झिरपणारे पाणी साचू नये याकरीता तेथे अधिक क्षमतेचे पंप बसवून तेथील पाणी सातत्याने काढण्यात यावेजेणेकरुन साचलेल्या पाण्यात होणाऱया डासांच्या उत्पत्ती स्थानांच्या निर्मितीला प्रतिबंध होईल असे म्हटले आहे. 

तसेच सदर ठिकाणी डासांबाबत आवश्यक ती प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे शक्य होईलतळघर किंवा जमिनीच्या खाली असणाऱया बांधकाम परिसरांमध्ये व तेथील सर्व काना-कोपऱयांमध्ये प्रकाश असावा यासाठी दिव्यांची सुयोग्य व्यवस्था असावीबांधकाम सुरु असलेल्या इमारतीमध्ये प्रस्तावित शौचालयन्हाणीघर (बाथरुमयासारख्या जागांसाठी राखून ठेवलेल्या खड्डयांमध्ये तसेच इतर ठिकाणी 'क्युरींग प्रोसेससाठी टाकण्यात आलेले व साचलेले पाणी 'क्युरींग प्रोसेसनंतर त्वरित काढण्यात यावेबांधकाम परिसरात कार्य करीत असलेल्या सर्व कामगारांना मच्छर प्रतिबंधक जाळ्या पुरविण्यात याव्यात.बांधकामाच्या ठिकाणी एका वैद्यकीय व्यावसायिकाची (डॉक्टरचीनेमणूक करण्यात यावीबांधकाम परिसरात कार्य करणाऱया सर्व कामगारांना 'हेल्थ कार्ड'देण्यात यावे.बांधकाम परिसरामध्ये ज्या कामगारांची नव्याने नेमणूक होईलअशा प्रत्येक कामगाराची हिवताप (मलेरियाविषयक रक्त चाचणी करणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे. या सर्व बाबींची अंमलबजावणी बांधकाम व्यावसायिकांनी बांधकाम सुरु असलेल्या सर्व परिसरांमध्ये तातडीने करावयाची असून जे बांधकाम व्यावसायिक महापालिकेच्या आदेशानुसार १० कलमी कार्यक्रम राबविणार नाहीतत्यांना महापालिकेच्या 'इमारत प्रस्तावखात्याद्वारे बांधकाम थांबविण्याचे आदेश अर्थात 'स्टॉप वर्क नोटीसदेण्यात येऊन नियमानुसार यथोचित कारवाई करण्यात येईल. या तपशीलानुसार बृहन्मुंबई महापालिका परिसरात सुरु असलेल्या बांधकाम परिसरांना तातडीचे आदेश देण्यात आले आहेत. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages