भाजपा - शिवसेना शासित बृहन्मुंबई महानगर पालिका नियमित स्वत्छ्ता राखण्यासाठी काय निर्णय घेणार - संजय निरुपम... - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

भाजपा - शिवसेना शासित बृहन्मुंबई महानगर पालिका नियमित स्वत्छ्ता राखण्यासाठी काय निर्णय घेणार - संजय निरुपम...

Share This

मुंबई शहरात दररोज आठ हजार मेट्रिक टन कचरा गोळा होतो. त्यापैकी सहा हजार मेट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते व उर्वरित दोन हजार मेट्रिक टन कचरा मुंबईत राहत असल्यामुळे मुंबई शहरात रोगराई पसरत आहे. मुंबईमध्ये स्वच्छता नियमित राहावी म्हणून महानगर पालिकेनी पाऊले उचलली पाहिजे, असे संजय निरुपम म्हणाले.


लेप्टोस्पायरोसिस या रोगाने आतापर्यंत मुंबईतील मनपा रुग्णालयात १३ जण मृत्युमुखी पडलेत, लेप्टोस्पायरोसिसचे ८६ रुग्ण आढळले असून २३० जणांना बाधा झाल्याचे निष्पन्न झालेले आहे, तसेच मुंबईतील मनपा रुग्णालयात डॉक्टर, नर्स, वार्ड बॉय, औषधे यांचा अभाव आहे. एकीकडे स्वच्छता अभियानाची विज्ञापन जोरदार आहेत आणि दुसरी कडे अस्वच्छते मुळे हे पसरलेली हि रोगराई.  भाजपा - शिवसेना शासित बृहन्मुंबई महानगर पालिका नियमित स्वत्छ्ता राखण्यासाठी काय निर्णय घेणार आहे असे संजय निरुपम म्हणाले. कांदिवली पश्चिम येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मनपा रूग्णालयातील रुग्णांना मिळणाऱ्या सोयीसुविधा बद्दल चौकशी करताना मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या सोबत मनपा विरोधी पक्षनेता बाळा आंबेरकरनगरसेवक शिवा शेट्टी, रामआशिष गुप्ता, अजंता यादव, गीता यादव, नेहा पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages