कॅम्पा कोला' गृहसंकुलाचे लिज कायमचे रद्द करण्याची मागणी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कॅम्पा कोला' गृहसंकुलाचे लिज कायमचे रद्द करण्याची मागणी

Share This
मुंबई : वरळी येथील वादग्रस्त 'कॅम्पा कोला' गृहसंकुलाचे लिज कायमचे रद्द करण्याची मागणी महापालिका प्रशासनाने उच्च न्यायालयाकडे केली आहे. महापालिकेला उच्च न्यायालयाच्या निर्देशांची प्रतीक्षा आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाच्या वतीने सुधार समितीला देण्यात आली.

हा लिज करार गेल्या महिन्यात रद्द होणे अपेक्षित होते, पण यासंबंधीचे निर्देश लवकरच मिळतील, अशी शक्यता पालिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दै. 'पुण्य नगरी'शी बोलताना व्यक्त केली. वरळी येथील मालमत्ता योजना क्र. ५८ च्या संदर्भात 'मे. प्युअर ड्रिंक्स प्रा. लि.' सोबत केलेला मक्त्याचा करार रद्द करण्यासंबंधी महापालिकेने २४ डिसेंबर १९९२ रोजी ठराव केला होता आणि त्याबाबतचा पत्रव्यवहार सुधार समितीकडे पाठवला होता. हा ठराव सुधार समितीने संमत केला होता, पण आयुक्तांकडून ३0 जून २0१५ पर्यंत या ठरावावर अहवाल मिळाला नाही. याविषयी शुक्रवारी सुधार समितीच्या बैठकीत चर्चा झाली. शिवसेनेच्या माजी महापौर आणि नगरसेविका श्रद्धा जाधव, डॉ. शुभा राऊळ, राजू पेडणेकर, काँग्रेसचे सुरेश कोपरकर, नोशिर मेहता यांनी यासंबंधी विचारणा केली असता, 'कॅम्पा कोला'चे लिज कायमचे रद्द करण्याची मागणी महापालिका प्रशासनाने उच्च न्यायालयाकडे केली आहे. महापालिकेला उच्च न्यायालयाच्या निर्देशांची प्रतीक्षा आहे, अशी माहिती पालिकेचे उपायुक्त (सुधार) किशोर क्षीरसागर यांनी सदस्यांना दिली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages