मुंबई, शुक्रवार (प्रतिनिधी)- नाईट लाईफ व गच्चीवरील पार्टी हे शिवसेनेचे दोन्ही प्रस्ताव यापूर्वी सुधार समितीने फेटाळल्यानंतर आता महालक्ष्मी येथील रेसकोर्सवरील थीमपार्कचा प्रस्तावावरही चर्चा न होता परत पाठवण्यात आला. हा प्रस्ताव आता येत्या सुधार समितीच्या बैठकीत पुन्हा चर्चेला येणार आहे. यापूवी शिवसेनेचे दोन्ही प्रस्ताव फेटाळण्यात आले होते. त्यात सुधार समिती भाजपाच्या ताब्यात असल्यामुळे शिवसेनेचे प्रस्तावांना अडवणूक केली जात असल्याचे बोलले जात आहे. मात्र, थीमपार्कचे शिवसेनेचे स्वप्न असल्याने या प्रस्तावाला मंजुरी मिळवणे शिवसेनेसाठी महत्वाचे असणार आहे.
महालक्ष्मी रेसकोर्स येथे सध्या घोड्यांच्या शर्यतीसाठी वापरण्यात येणारा भूखंड पालिकेने ताब्यात घेऊन त्याच्यावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे थीम पार्क उभारावे हा प्रस्ताव शुक्रवारी सुधार समितीच्या बैठकीत चर्चेसाठी होता. पण यावर चर्चा न होता दप्तरी दाखल करावा अशी मागणी सदस्यांनी केली. त्यानंतर बहुमताच्या आधारावर हा प्रस्ताव परत पाठवण्यात आला. आंतराष्ट्रीय दर्जाचे पार्क विकसित झाल्यास देश-विदेशातून येणारे पर्यटक मुंबईकडे आकर्षित होतील, असे प्रस्तावात म्हटले आहे. रेसकोर्सचा महापालिकेशी झालेला करार २०१३ ला संपला आहे. सुमारे आठ लाख चौ. मी. इतक्या क्षेत्रफळाचा हा भूखंड आहे. मुंबईतील रहिवाशांना या जागेचा काहीही उपयोग होत नसून केवळ उच्चभ्रू वर्गातील रहिवाशीच या रेसकोर्सचा उपभोग घेतात. मुंबई हे आंतराष्ट्रीय दर्जाचे शहर असल्याने जगभरातून येथे पर्यटक येतात. आंतरराष्ट्रीय दर्जाचे पार्क विकसित केल्यास मुंबईकडे पर्यटक आकर्षित होतील. त्यामुळे महापालिकेने याकडे लक्ष वेधून पावले उचलावीत, असा शिवसेनेचा प्रस्ताव आहे