पत्रकार संरक्षण कायदा लवकरच होणार - सरकार सकारात्मक - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पत्रकार संरक्षण कायदा लवकरच होणार - सरकार सकारात्मक

Share This
मुंबई ( प्रतिनिधी ) - पत्रकारांवर वाढते हल्ले रोखण्यासाठी पत्रकार संरक्षण कायदा लागू करा या मागणीसाठी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने आज दुपारी आझाद मैदानात जोरदार निदर्शने केली याच मागणीसाठी कृती समितीचे शिष्‍टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटले पत्रकार संरक्षण कायदा संदर्भात सरकार सकारात्मक असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले

राज्यात पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे गेल्या तीन वर्षांत राज्यात 181 पत्रकारांवर हल्ले झाले आहेत. या वषाॅत पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याची संख्या  43 वर गेली आहे हे हल्ले रोखण्यासाठी पत्रकार संरक्षण कायदा करा अशी मागणी करीत या कायद्याबाबत राज्य सरकार करीत असलेल्या दिरंगाई च्या निषेधार्थ जोरदार घोषणा देत पत्रकारांनी आझाद मैदान दणाणून सोडले कृती समितीचे निमंत्रक एस एम देशमुख आणि किरण नाईक यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्‍टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली पत्रकार संरक्षण कायदा बाबत आम्ही सकारात्मक असल्याची ग्वाही मुख्यमंत्री यांनी दिली. विधान सभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचीही कृती समितीच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन पत्रकार संरक्षण कायदा लागू करण्यासाठी आगह धरला विरोधी पक्षनेत्यानी या मागणीला पाठिंबा असल्याची ग्वाही दिली पत्रकारांच्या पेन्शन योजनेलाही मुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्षनेत्यानी पाठिंबा दिला.  यापूर्वी राज्यपाल सी विद्या सागरराव यांचीही पत्रकारांच्या शिष्‍टमंडळाने भेट घेतली होती. राज्यपालानीही पत्रकार संरक्षण कायदा झाला पाहिजे असे मत व्यक्त केले होते नुकत्याच उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात झालेल्या तीन पत्रकारांच्या अमानुष हत्येचा पत्रकारांनी निषेध केला

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages