रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

Share This
मुंबई - रेल्वेच्या तिन्ही मार्गावर दुरुस्तीच्या कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवारी रात्री ११.०० ते रविवारी पहाटे ५.१५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. वसई ते भाईंदरदरम्यान अप जलद मार्गावर शनिवारी रात्री ११.०० ते रविवारी पहाटे ३.०० वाजेपर्यंत तर डाऊन जलद मार्गावर मध्यरात्री १.१५ ते पहाटे ५.१५ या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 

त्यामुळे रविवारी दिवसभर पश्चिम रेल्वेवरील वाहतूक सुरळीत राहील. मध्य रेल्वे मार्गावर मुलुंड ते माटुंगा अप धीम्या मार्गावर रविवारी सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येईल. याशिवाय हार्बर लाईनवरील जीटीबीनगर ते मानखुर्ददरम्यान अप-डाउन मार्गावर ११.०० ते ३.०० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला असून यावेळेत प्रवाशांना ट्रान्स हार्बर मार्गाने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages