अण्णा भाऊ साठे महामंडळातील भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अण्णा भाऊ साठे महामंडळातील भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार

Share This
मुंबई - अण्णा भाऊ साठे महामंडळामध्ये सुमारे 576 कोटींचा भ्रष्टाचार झाला असून, त्यामध्ये महामंडळाच्या तत्कालीन अध्यक्षांसहित महामंडळाचे काही अधिकारी व बॅंकांचे काही अधिकारी गुंतलेले आहेत. सोमवारी यासंदर्भातील सीआयडी चौकशीचा अहवाल येईल, त्यानंतर यामध्ये गुंतलेल्या सर्वांविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दिली. भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चातर्फे व आमदार विजय गिरकर यांच्या नेतृत्वाखाली आज आझाद मैदानात धरणे आंदोलन करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages