पालिका रुग्णालये, शाला, मुख्यालयात हवेपासून पाणी बनवणारे यंत्र बसवणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिका रुग्णालये, शाला, मुख्यालयात हवेपासून पाणी बनवणारे यंत्र बसवणार

Share This

मुंबई । अजेयकुमार जाधव
मुंबईमधे पाउस कमी पडला तरी पाण्याची समस्या जाणवू नए म्हणून हवेपासून पाणी बनवण्याचे यंत्र बसवणार असल्याची माहिती सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी दिली.


हैदराबाद, कर्नाटक, आसाम अश्या काही ठिकाणी या हवे पासून पाणी बनवणाऱ्या मशीन बसवण्यात आल्या आहेत. एखादया वेळी पाउस कमी पडला तरी हवे मधील आद्रतेमधून या मशीन द्वारे पाणी बनवता येवू शकणार आहे. या मशीनला पाण्याचा पाइप लावण्याची आवश्यकता नसल्याने दूषित पाण्याचा प्रश्न उद्भवणार नाही. या मशीन मधील पाणी शुद्ध असल्याने शाला, रुग्णालये पालिका मुख्यालय अश्या ठिकाणी हे मशीन लावण्यात येणार आहे. स्काय वाटर कंपनीने याबाबतचा प्रस्ताव दिला असून महापौर स्नेहल आंबेकर यांच्याकडेही असे प्रस्ताव आले आहेत. येत्या गटनेत्यांच्या बैठकीत या यंत्रा द्वारे हवे पासून पाणी कसे बनते याचे प्रात्यक्षिक दाखवले जाणार आहे. गटनेत्यांच्या बैठकीत याला मंजूरी मिलाल्यास कमीतकमी किंम्मत लावनारया कंपनीला कंत्राट दिले जाइल अशी माहिती विश्वासराव यांनी दिली आहे.

स्काय वाटर कंपनीने 100 लिटरच्या मशीनसाठी 1 लाख 55 हजार, 165 लिटर च्या मशीनसाठी 3 लाख, 700 लिटरच्या मशीनसाठी 12 लाख 50 हजार, 1000 लिटरच्या मशीनसाठी 15 लाख रुपये इतका अन्दाजीत खर्च येईल असा प्रस्ताव सादर केला आहे. येत्या गटनेत्यांच्या बैठकीत या प्रस्तावाबाबत चर्चा होणार असून हवे पासून पाणी हे यंत्र कसे बनवते याचे प्रात्यक्षिक सादर केले जाणार आहे. गट नेत्यांच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजूरी मिलाल्यास पालिका शाला, रुग्णालये, मुख्यालय या ठिकाणी ही यंत्रे लावली जाणार आहेत

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages