मुंबई : शालेय विद्यार्थ्यांचे शोषण करण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्याचबरोबर स्कूल बसचे चालक बस वेगाने चालवत असल्याच्या घटनांची संख्यादेखील वाढत आहे. यावर उपाय म्हणून स्कूल बसचा चालक महिला असावी, असा प्रस्ताव राज्याच्या परिवहन विभागाच्या विचाराधीन आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यात स्कूल बसच्या चालक म्हणून महिला असणार आहेत.
शालेय विद्यार्थ्यांना शाळेमध्ये घेऊन जाणार्या बसेसमध्ये विद्यार्थ्यांवर अत्याचाराच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यातच खंडणीसाठीदेखील विद्यार्थ्यांचे अपहरण करण्यात आल्याच्या घटना आहेत. अशा घटनांमध्ये बसचा चालक दोषी असल्याचे अनेकवेळा सिद्ध झाले आहे. त्यामुळे स्कूल बसवर महिला चालकांची नियुक्ती करण्यात यावी, असा प्रस्ताव परिवहन विभागाने तयार केला आहे. स्कूल बस ओनर्स असोसिएशनने स्कूल बसवर महिला चालक असावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे महिलांना रोजगाराची संधी देखील मिळणार आहे.
सध्या मुंबई आणि उपनगरात एकूण ५ हजार स्कूल बसेस आहेत, ज्या विद्यार्थ्यांची रोज शाळेत ने-आण करतात. २२ मार्च २0१२ च्या स्कूल बस नियमावलीनुसार स्कूल बसचे परमिट मिळवण्यासाठी स्कूल बसमध्ये आवश्यक ते बदल करावे लागतात. स्कूल बस नियमावलीनुसार स्कूल बसमध्ये एक महिला कर्मचारी असावी लागते; परंतु अनेक स्कूल बसमध्ये महिला कर्मचारी नाहीत. स्कूल बस ओनर्स असोसिएशनने मार्च २0१४ मध्ये महिला चालकांना स्पेशल लायसन्स आणि परमिट देण्याची मागणी केली होती. तसेच महिलांना स्कूल बस चालवण्यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण देण्याची तयारीदेखील दर्शवली होती.राज्याच्या परिवहन विभागाच्या नियमानुसार चालकाकडे स्कूल बस चालवण्याचा किमान ५ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. त्यामुळे महिलांना चालक म्हणून आवश्यक असलेले परमिट देण्यात काही क ायदेशीर अडचणी असल्याचे मत परिवहन विभागातील वरिष्ठ अधिकारी व्यक्त करतात. महिलांना परमिट देण्यासाठी प्रथम नियमावलीत किंवा परिवहन विभागांच्या नियमांमध्ये काही बदल करणे आवश्यक असल्याचे अधिकारी सांगतात. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी परिवहन विभागाच्या आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या विचाराधीन आहे.