मुंबई : एसटी महामंडळामध्ये २0१२ च्या भरतीमध्ये मुंबई प्रदेशात चालक कमी मिळाल्याने राज्यातल्या विविध विभागांमध्ये ५0 टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त करून उत्तीर्ण झालेल्या ७२७ चालकांना मुंबई आणि कोकणात नेमणुका देण्यात आल्या आहेत. तेव्हापासून या चालकांना मुंबई आणि कोकणातच काम करावे लागत आहे. या चालकांना ते भरती झालेल्या मूळ विभागात बदली करून पाठवण्यात यावे, या एकमेव मागणीसाठी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसतर्फे १५ सप्टेंबरपासून आमरण उपोषण करण्यात येणार आहे.
एसटी महामंडळामध्ये २0१२ मध्ये संपूर्ण राज्यभर चालक पदाची भरती करून घेण्यात आली होती. त्या वेळी प्रत्येक विभागासाठी चालक पदाच्या उमेदवाराकडून स्वतंत्र अर्ज घेण्यात आले होते. महामंडळात भरती प्रक्रियेमध्ये प्रत्येक विभागासाठी उमेदवारांकडून स्वतंत्र अर्ज घेण्याची पद्धत आहे. भरती करताना त्या त्या विभगासाठीच केली जाते. एका विभागात भरती करून दुसर्या विभागात पाठवण्याची पद्धत नाही. तरीदेखील २0१२ च्या भरतीमध्ये मुंबई प्रदेशात चालक कमी मिळाल्याने राज्यातल्या विविध विभागांत ५0 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळालेल्या चालकांना मुंबई आणि कोकणात नेमणुका देण्यात आल्या. या नेमणुका देताना त्या तात्पुरत्या स्वरूपाच्या असतील, असे तोंडी सांगण्यात आले होते; परंतु तसे झाले नाही. २0१२ पासून ७२७ चालक मुंबई प्रदेशातील विविध विभागांत कार्यरत आहेत. गेल्या २ वर्षांपासून एप्रिल आणि मे महिना सोडला, तर चालकाला संपूर्ण महिनाभर क ाम मिळालेले नाही. हे चालक कनिष्ठ वेतनश्रेणीत मोडत असून त्यांना ८ ते ९ हजार इतका पगार संपूर्ण दिवस भरल्यानंतर मिळतो. यातील अनेक चालकांना महिन्यातले २0 दिवससुद्धा काम मिळत नाही. त्यातील काही चालकांची उपासमार होत आहे. त्यामुळे या चालकांना त्यांच्या मूळ गावी पाठवणे आवश्यक आहे. सध्या मुंबई प्रदेशात शासन मंजुरीपेक्षा २७३ चालक जास्त असून नव्याने होणार्या भरतीमध्येसुद्धा चालक बर्यापैकी मिळतील, अशी आशा आहे. त्यामुळे या ७२७ चालकांना त्यांच्या मूळ गावी बदली करून पाठवण्यात यावे, या मागणीसाठी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसतर्फे संघटनेचे अध्यक्ष आ. भाई जगताप यांच्या अध्यक्षतेखाली १५ सप्टेंबरपासून मुंबईतील आझाद मैदान येथे आमरण