कामगारांच्या चौक्यांना विभाग कार्यालयाचा दर्जा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कामगारांच्या चौक्यांना विभाग कार्यालयाचा दर्जा

Share This
मुंबई / प्रतिनिधी - मुंबई महापालिका आयुक्तपदी विराजमान झाल्यानंतर अजोय मेहता यांची तिसरी आढावा बैठक शनिवारी पार पाडली. आयुक्तांनी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी बैठक घेण्यात येईल, असे जाहीर केले होते. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सर्व विभाग कार्यालयांचे सहायक आयुक्त, सर्व खात्यांचे प्रमुख अधिकारी आदींची तब्बल ७ तास बैठक झाली. या बैठकीत सफाई कामगारांसह सर्व कामगारांच्या चौक्यांकडे विभाग कार्यालयाप्रमाणे पाहण्याची दृष्टी आयुक्तांनी दिली. कामगारांच्या चौक्यांमध्ये विभाग कार्यालयांप्रमाणेच सेवासुविधा पुरवल्या गेल्या पाहिजे. या ठिकाणचा परिसर स्वच्छ, सुंदर असावा तसेच पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र जागा आणि स्वतंत्र प्रसाधनगृहांची व्यवस्था असावी. त्या ठिकाणी स्वच्छ पाणी पुरवले जावे.

कोणत्याही चौक्यांमध्ये यापुढे दरुगधी दिसणार नाही, याची काळजी प्रत्येक विभागाच्या सहायक आयुक्तांनी घ्यायला हवी, असे आदेशच आयुक्तांनी या आढावा बैठकीत दिल्याचे समजते. मुंबई महापालिकेने शौचालयांसाठी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. या तरतुदीचा योग्य वापर करून हगणदारीमुक्त शहर करण्याचा प्रयत्न करण्यासाठी प्रयत्न केला जावा. ज्या ठिकाणी शौचालय नसेल तिथे बांधले जावे, जुने शौचालय असेल तर तिथेच एक ते दोन मजली प्रसाधनगृह बांधले जावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. यासाठी विभाग कार्यालयाच्या सहायक आयुक्तांना हा निधी खर्च करण्याचेही अधिकार देण्यात आल्याचे समजते.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages