मुंबई / प्रतिनिधी - मुंबईत रस्त्यांवरील बुजवलेले खड्डे पुन्हा पडल्यामुळे यासाठी वापरण्यात येणा-या कोल्डमिक्स तंत्राची तपासणी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले असून येत्या ७ जुलैपर्यंत नमुन्यांचा तपासणी अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. वेगवेगळ्या रस्त्यांसाठी कंत्राटदारांकडून वापरण्यात येणारे कोल्डमिक्स नमुने स्वतंत्रपणे प्लास्टिक पिशव्यात जमा करून याचा अहवाल तयार करण्यात यावा, अशाही सूचना रस्ते प्रमुख अभियंत्यांना दिल्या आहेत.
सर्व उपायुक्तांना रस्त्यांची एक यादी करण्यासाठी मसुदा दिला आहे. त्यानुसार रस्त्यांची नावे, बांधकाम झाल्याचे वर्ष, हमी कालावधीकरता उरलेली वर्षे आणि निरीक्षण करण्यात आलेले या रस्त्यांवरील खड्डे, अशी माहिती भरून याचा अहवाल आयुक्तांना सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच खड्डे पडू नयेत म्हणून खराब रस्त्यांच्या भागाचे सपाटीकरण करण्यासाठी वापरण्यात येणा-या कोल्डमिक्स तंत्राचा दर्जा तपासण्यात यावा आणि रस्ते प्रमुख अभियंत्यांनी ७ जुलैपर्यंत याचा अहवाल सादर करावा, असे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत. दरम्यान, मुख्याध्यापक नाल्यावरील मोठय़ा प्रमाणात अतिक्रमण असून येथील अनधिकृत झोपडय़ा त्वरित हटविण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. परिमंडळ २चे उपायुक्त आनंद वाघ्राळकर यांना ही कारवाई त्वरित राबवण्याच्या सूचना केल्या आहेत.