मुंबई / प्रतिनिधी
मध्य प्रदेश भोपाळ येथील इटारसी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रूळ इंटरलॉकिंग क्याबीनला जून महिन्याच्या मध्यावधीत आग लागली होती. या आगीमुळे मुंबई, महाराष्ट्र आणि उत्तर भारतातील संपर्क तुटला आहे. या प्रकरणाला एक महिना होत आला तरी रेल्वे प्रशासन आणि रेल्वे मंत्रालयाला या मार्गावरील रेल्वे सेवा सुरळीत करण्यात आलेली नाही. दर दिवशी या मार्गावरील ७० ते ८० ट्रेन रद्द केल्या जात आहेत. एक महिना रेल्वे सेवा बंद असल्याने उत्तर भारतातून येणारे लाखो प्रवासी रेवे स्थानकावर अडकून पडले आहेत. अश्या प्रवाश्यांना रेल्वे द्वारे कोणत्याही सूचना दिल्या जात नसल्याने प्रवाश्यांचे हाल होत आहेत. रमजानचा महिना असल्याने आणि ईद हा सण जवळ आला असताना प्रवाश्यांचे हाल होत आहेत. अनेकांना आपल्या मुलाला शाळेत प्रवेश घेता आलेले नाहीत हि परिस्थिती लक्षात घेवून काँग्रेसचे माजी मंत्री नसीम खान, आमदार कृपाशंकर सिंग, राजहंस सिंग यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनीलकुमार सूद यांची मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे भेट घेतली. प्रवाश्यांचा त्रास कमी करण्यासाठी लवकरात लवकर काम करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करावी तसेच रेवे मंत्री सुरेश प्रभू यांनी या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणीही या वेळी करण्यात आली.

