मालवणी विषारी दारूकांड - डॉ. आंबेडकर रुग्णालयात डायलिसीस सेंटर चालवणाऱ्या नेमिनाथ ट्रस्टवर कारवाई करा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मालवणी विषारी दारूकांड - डॉ. आंबेडकर रुग्णालयात डायलिसीस सेंटर चालवणाऱ्या नेमिनाथ ट्रस्टवर कारवाई करा

Share This
मुंबई / प्रतिनिधी 
मालवणी विषारी दारूप्रकरणी डॉ. आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांना वेळीच डायलिसीस सेंटर चालवण्यासाठी पालिकेने परवानगी दिलेल्या नेमिनाथ ट्रस्टने कोणतीच मदत केली नाही. याप्रकरणी मनसेच्या उपाध्यक्षा शालिनी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांची भेट घेऊन या ट्रस्टवर कारवाई करण्याची मागणी केली.
 
पालिकेच्या अर्थसंकल्पात वैद्यकीय आणि आरोग्य विभागासाठी ३ हजार ३५९ कोटींची तरतूद केली आहे. मुंबई आरोग्य अभियानांतर्गत अनेक योजनांची घोषणा अर्थसंकल्पात केली आहे. त्यामध्ये खाजगी-सरकारी तत्त्वावर प्रकल्प राबवण्याचे प्रयोजन पालिका आयुक्तांनी केले आहे. खाजगी-सरकारी तत्त्वावर पालिकेने खाजगी संस्थांना पालिकेच्या रुग्णालयातील जागा नाममात्र दराने उपलब्ध करून फक्त पैसे कमवायला दिले आहेत का, आणीबाणीच्या वेळी या संस्था जर मदत करणार नसतील, तर त्यांचा काय उपयोग, मालवणी दारुकांड झाल्यानंतर रग्णालयात भरती झालेल्या रुग्णांना सेवा तत्परतेने मिळवून देण्यासाठी पालिकेच्या वतीने वरिष्ठ आरोग्य अधिकारी रुग्णालयात का उपस्थित नव्हते, मुंबई पालिकेच्या हद्दीत अत्याधुनिक बर्न सेंटर का नाही, आदी प्रश्न त्यांनी देशमुख यांना केले. मालवणी विषारी दारूप्रकरणी नेमिनाथ ट्रस्टने जर मदत केली नसेल, तर चौकशी करून पालिका त्यांच्यावर नक्कीच कारवाई करेल, असे आश्‍वासन देताना 'पीपीपी' तत्त्वावर रुग्णालयाचे कंत्राट मिळवणार्‍या ९0 टक्के संस्था करारामुळे वागत नसल्याने पालिका त्यांच्याविरोधात पालिका उच्च न्यायालयात केस दाखल करणार आहे, अशी माहिती देशमुख यांनी दिली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages