मांसाहार शाकाहार वाद पेटणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मांसाहार शाकाहार वाद पेटणार

Share This
मुंबईच्या दहिसर येथे नुकतीच नाट्य निर्माते गोविंद चव्हाण यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना शिवीगाळ करून मारहाण करण्याचा प्रकार नुकताच घडला आहे. चव्हाण यांच्या कुटुंबियांना मांसाहार खातात म्हणून या शुल्लक कारणावरून मारहाण करण्यात आली आहे. मांसाहार खातात म्हणून गुजराती भाषिकांकडून माणसाला मुंबई महाराष्ट्रात मारहाण करण्यात आल्याने मुंबईमध्ये पुन्हा मांसाहार विरुद्ध शाकाहार असा वाद पेटण्याची चिन्ह दिसू लागली आहे.

यु टर्न’, ‘मदर्स डे’, ‘जाऊ द्या ना भाई’ यांसारख्या प्रसिद्ध मराठी नाटकांचे निर्माते गोविंद चव्हाण हे आपल्या कुटुंबासह दहिसरमधील बोना व्हेंचर या गुजराती, जैन-मारवाडीबहुल इमारतीत राहतात. चव्हाण हे मांसाहार करत असल्याने गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास या सर्व रहिवाश्यांनी त्यांच्या घराबाहेर जमून त्यांना शिविगाळ करण्यास सुरूवात केली. यावेळी चव्हाण यांच्या पत्नी व मुलीला मारहाणीचाही प्रयत्न झाला. या प्रकारानंतर चव्हाण कुटुंबियांनी घराचे दार बंद करून घेतल्याने त्यांच्या दारावर लाथा मारून दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करण्यापर्यंत या गुजराथी मारवाडय़ांची मजल गेली.

या प्रकारानंतर गोविंद यांची कन्या सुप्रिया यांनी फेसबूकवरून या प्रकाराला वाचा फोडत या प्रकाराचा व्हिडिओही शेअर केला. यानंतर प्रसारमाध्यमांनी हा विषय उचलून धरल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र या उद्दाम रहिवाश्यांनी चव्हाण कुटुंबिय आपल्या घरासमोर अंडी व घाण पाणी टाकत असल्याचा कांगावा करत पोलिसांसमोरच चव्हाण कुटुंबियांना पुन्हा मारहाण करण्याचा प्रयत्न केला.

या घटनेनंतर चव्हाण कुटुंबियांनी पोलीसांना पाचारण केले असता हल्लेखोरांनी थेट पोलिसांनाच चपला फेकून मारल्या. शिवाय पोलीसांसमोर पुन्हा चव्हाण कुटुंबाच्या घरावर चपला मारल्या. मुंबई आणि महाराष्ट्रात मराठी किंवा इतर भाषिकानी काय खावे काय खाऊ नए हे आता गुजराती भाषिक ठरवू लागले आहेत. एखाद्याला घर घ्यायचे असल्यास मांसाहार करत नसल्याचे सांगितले तरच मुंबई मधे घर विकत किंवा भाड्याने मिळत आहे.

हे प्रकार गेल्या काही वर्षात वाढले आहेत. इमारत बांधकाम व्यवसायात गुजरात्यांचा भरणा आहे. इमारती बांधल्यावर या इमारतीमधे गुजराती आणि शाकाहारी लोकांना घरे विकली जातात. काही ठिकाणी मराठी किंवा मांसाहार करणाऱ्याला मांसाहार करावयाचा असल्यास इमारतीमधे मुंबईचा भूमिपुत्र असलेल्या मासे विक्रेत्याला आत येण्या पासून रोखले जात आहे.

हि दादागिरी सुरु करायला सरकारनेच हिम्मत दिली आहे. गुजराती असलेले नरेन्द्र मोदी आपल्या देशाचे प्रधानमंत्री आहेत. केंद्र आणि राज्यात भांडवलदार व एका विशिष्ट समाजाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या भाजपाचे सरकार सत्तेत आहे. देशाचे प्रधानमंत्री असलेले मोदी सातत्याने गुजरातचा उदो उदो करत आले आहेत. मुंबई महानगर पलिकेने मांसाहार शाकाहार असा भेदभाव करणाऱ्या बिल्डरवर कारवाई करण्याचा नियम बनवण्याची चर्चा केली परंतू पुढे काहीही केले नसल्याने  बिल्डरचे आणि गुजराती मारवाडयाचे चांगलेच फावले आहे.

कोळी बांधव हे मुंबईचे भूमिपुत्र त्यांचाही रोजगार बंद करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. मुंबईमधे गेल्या काही वर्षात गुजराती मारवाड़ी यांची संख्या वाढली आहे. या लोकानी मुंबई काबीज करून आपल्या लोकसंखेच्या जोरावर आता दादागिरी सुरु केली आहे. ही दादागिरी मोडून काढण्यासाठी आमदार नितेश राणे, शिवसेना आणि मनसे सरसावली आहे. गुजराती भाषिकांशी दोन हात करण्याचे, जशास तसे उत्तर देण्याचे, गुजरात्याना गुजरातला परत पठावण्याचे इशारे देण्यात आले आहेत.

असे सर्व प्रकार सुरु असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणविस यांनी मुंबई आणि महाराष्ट्रात असा वाद नसल्याचे उत्तर  विधानसभेत दिले होते. मग आता हे काय चालू आहे असा प्रश्न उपस्थित करत सोमवारी विधानसभेत तारांकित प्रश्न विचारून चर्चा घडवणार असल्याचे नितेश राणे यांनी पत्रकराना सांगितले आहे. यामुले आता सर्वत्र हा वाद चांगलाच गाजणार आहे. मांसाहार आणि शाकाहार प्रकरणात सर्वच पक्ष आपआपल्या पध्हतीने आपली राजकीय पोली भाजण्यात यशस्वी होतील परंतू यामधे सामान्य नागरिकांच्या मुलभुत अधिकाराकडे दुर्लक्ष होता कामा नए.

वास्तविक पाहता भारतीय राज्य घटनेने (संविधानाने) भारतीय नागरिकांना कोणत्याही प्रांतात राहण्याचा कमवून खाण्याचा अधिकार दिला आहे. संविधानाने दिलेल्या अधिकारावर गदा आणण्याचे काम सध्या सुरु आहे. नागरिकांच्या मुलभुत अधिकारावर गदा येत  असताना सरकार मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. सरकार जर असे प्रकार घडताना बघ्याची भूमिका घेवुन काही विशिष्ट अश्या भाषिकांसाठी इतर समाजाला आणि नागरिकांना मुलभुत अधिकारापासून वंचित ठेवत असतील तर न्यायालयाने यामधे हस्तक्षेप करून सरकारला आपल्या कामाची जाणीव आणि नागरिकांना न्याय द्यायला हवा.

अजेयकुमार जाधव
मो. 9969191363

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages