मुंबई । अजेयकुमार जाधव
दहिसर येथील नाट्य दिग्दर्शक गोविंद चव्हाण आणि त्यांच्या कुटुम्बियाना झालेल्या मारहाणीबाबत प्रतिक्रिया देताना नितेश राणे बोलत होते. मराठी माणूस मांसाहार खातो म्हणून बिल्डर घरे नाकारत होते. त्यावेळी मी केलेल्या वक्तव्यावरुन माझ्यावर प्रांतवादी अशी टिका करण्यात येत होती. मी त्या वेळी जे बोलत होतो तेच आज समोर येत आहे असे राणे यांनी सांगीतले.
मुंबई आणि महाराष्ट्रात मराठी माणसाने काय खावे हे बाहेरून आलेले गुजराती ठरवणार असतील आणि मराठी लोकाना मारहाण करणार असतील तर अश्या गुजरात्याना गुजरातला पाठवायला वेळ लागणार नाही असा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला आहे.
दहिसर येथील नाट्य दिग्दर्शक गोविंद चव्हाण आणि त्यांच्या कुटुम्बियाना झालेल्या मारहाणीबाबत प्रतिक्रिया देताना नितेश राणे बोलत होते. मराठी माणूस मांसाहार खातो म्हणून बिल्डर घरे नाकारत होते. त्यावेळी मी केलेल्या वक्तव्यावरुन माझ्यावर प्रांतवादी अशी टिका करण्यात येत होती. मी त्या वेळी जे बोलत होतो तेच आज समोर येत आहे असे राणे यांनी सांगीतले.
महाराष्ट्रात मराठी माणसावर अन्याय होत आहे अशी परिस्थिती आज आली आहे. मराठी माणसावर अन्याय होत असताना आता जर जशास तसे उत्तर दिले नाही तर हे लोक मराठी माणसाला हकलून लावतील. मराठी माणसाला मारण्याची हिम्मत करणाऱ्या लोकाना जशास तसे उत्तर देवून त्यांचा चोख बंदोबस्त केला जाइल असा इशारा राणे यांनी दिला आहे.
मुंबईमधे असे प्रकार होत आहेत याबद्दल विधानसभेत तारांकित प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी मुंबईमधे असा वाद नसल्याचे उत्तर दिले होते. आता या प्रकाराबाबत पुन्हा आवाज उचलणार असल्याचे राणे यांनी सांगितले. आम्ही काय खायचे हे आमचा मुलभुत अधिकार आहे. त्यामुले बाहेरून आलेल्यानी आम्ही काय खायचे हे शिकवू नए असा इशाराही राणे यांनी दिला आहे.
हेच का अच्छे दिनपत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत. गेले दोन दिवस पत्रकारांवर हल्ले होत आहेत. हे प्रकार म्हणजे लोकशाहिचा गला घोटण्याचे प्रकार आहेत. पत्रकार जर मोकले फिरू शकत नसतील तर सामान्य लोकांचे हाल काय हाल असेल, हेच का अच्छे दिन असे प्रश्न उपस्थीत करत बिहार आणि उत्तर प्रदेश पेक्षा महाराष्ट्र मागे नसल्याचे राणे यांनी सांगीतले.