मुंबईत रात्रीच्या वेळी हैदोस घालणार्‍या दुचाकीस्वारांचा बंदोबस्त करणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईत रात्रीच्या वेळी हैदोस घालणार्‍या दुचाकीस्वारांचा बंदोबस्त करणार

Share This
मुंबई : मुंबईत रात्रीच्या वेळी मोटारसायकलींवरून हैदोस घालणार्‍या टोळक्यांचा बंदोबस्त करण्यात येईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी दिली. मुंबईत रात्रीच्या वेळी मोटारसायकलस्वारांकडून रस्त्यांवर घालण्यात येणार्‍या हैदोसाचा मुद्दा शिवसेनेच्या अर्जुन खोतकर यांनी औचित्याच्या माध्यमातून विधानसभेत उपस्थित केला होता. 

रस्त्यांवर या मोटारसायकस्वार टोळक्यांकडून अक्षरश: हैदोस घालण्यात येतो. आपापसात स्पर्धा लावण्यात येते. रस्त्यावरून जाणार्‍या इतर वाहनचालकांना त्रास देण्यात येतो. महिलांची छेडछाड करण्याचेही प्रकार या बाईकस्वारांकडून होतात. अशा प्रकारांमुळे मुंबईत जातीय तेढ वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी स्वत: लक्ष घालून तात्काळ कारवाई करण्याची मागणी अर्जुन खोतकर यांनी केली. या प्रश्नी आपण स्वत: लक्ष घालू व अशा हैदोस घालणार्‍या टोळक्यांवर कारवाई करण्याचे आदेश देऊ, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपणास दिल्याची माहिती अर्जुन खोतकर यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना दिली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages