पालिकेचा माहुल येथील भूखंड रिलायंसला भाड्याने देणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिकेचा माहुल येथील भूखंड रिलायंसला भाड्याने देणार

Share This
मुंबई / प्रतिनिधी - चेंबूर माहुल गावातील 2035 चौरस मीटर क्षेत्रफलाची महापालिकेच्या मालकीची जमीन रिलायंस इंफ्रास्ट्रक्चर कंपनीला विद्युत् उपस्थानके व् विज केंद्रासाठी भाड्याने देण्याचा प्रस्ताव सुधार समितीमधे मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.

रिलायंस इंफ्रास्ट्रक्चर कंपनीला माहुल येथील 792 चौरस मीटर जागेवर 12 विद्युत उपस्थानके व् 1243 चौरस मीटर1 विजग्रहण केंद्र बांधण्यासाठी 30 वर्षे किंवा ते विज केंद्र असे पर्यन्त भाड्याने जागा दिली जाणार आहे. सदर जागा रिलायंसला भाड्याने देण्यासाठी स्पर्धात्मक निविदा मागवण्यात आल्या नसून भुभागाच्या राखीव कीमतीवर 25 टक्के अधिक रक्कम आकारून 3 करोड़ 48 लाख 49 हजार 375 रुपये अधिमूल्य म्हणून तर 2035 रुपये भूईभाड़े म्हणून पालिका वसूल करणार आहे. या जमिनीचा ताबा 17/2/2012 रोजी रिलायंसला देण्यात आला असुन सन 2012 पासून भुईभाड़े वसूल करण्यात येणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages