मुंबईत तापाची साथ - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईत तापाची साथ

Share This
मुंबई : लेप्टो आणि स्वाईन फ्ल्यू पाठोपाठ मुंबईत तापाची साथ पसरली आहे. तापाचे सर्वाधिक ३ हजार ५६३ रुग्ण आढळून आले आहे. त्यानंतर गॅस्ट्रोच्या ८२२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मलेरिया ३३७, टायफाईड ७१, लेप्टो ६0, हेपिटायटिस ५८, डेंग्यू २२ आणि कॉलराचे ३ रुग्ण आढळून आहेत. जून महिन्यात धो धो बरसणार्‍या पावसाने जुलै महिन्यात दडी मारली आहे. यामुळे वातावरणात होणार्‍या बदलामुळे विषाणूंना पोषक अशा वातावरणाची निर्मिती होऊन साथीचे आजार पसरले आहेत. लेप्टोमुळे आतापर्यंत मुंबईत केवळ जुलै महिन्यात १६ जणांचा मृत्यू झाला आहे. लेप्टोवर नियंत्रण मिळवण्यास पालिकेला यश आले असताना स्वाईन फ्ल्यूनेही डोके वर काढले आहे. जुलै महिन्यात स्वाईन फ्ल्यूचे ७५ रुग्ण आढळून आले असून ४ जणांचा मृत्यू झाला आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages