पश्चिम रेल्वेच्या ट्रयाकजवळील झोपडीधारकांचा रेल रोकोचा इशारा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पश्चिम रेल्वेच्या ट्रयाकजवळील झोपडीधारकांचा रेल रोकोचा इशारा

Share This
मुंबई / प्रतिनिधी पश्चिम रेल्वे मार्गावरील एलफिस्टन ते दहिसर पर्यंतच्या १४५४ झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्याचे आदेश असतानाही अद्याप पुनर्वसन केले गेले नसल्याने या झोपडी धारकांचे त्वरित पुनर्वसन करावे अशी मागणी करत मुंबईच्या आझाद मैदानात धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी येत्या सात दिवसात या झोपडी धारकांचे पुनर्वसन करण्याबाबत सरकारने योग्य पावले न उचलल्यास रेल रोको करावा लागेल असा इशारा पश्चिम रेल्वे झोपडपट्टी रहिवाशी संघाचे सरचिटणीस नंदलाल यादव यांनी दिला.

पाशीं रेल्वे मार्गावरील एलफिस्टन ते दहिसर पर्यंतच्या १४५४ झोपड्यांचे पुनर्वसन अद्याप करण्यात आलेले नाही. या झोपड्या ४० ते ४५ वर्षापासून आहेत. एमयुटीपी २ या प्रकल्पाअंतर्गत या झोपड्यांना २००४-२००५ मध्ये तोडण्यात आले होते. त्या बदल्यात या झोपडीधारकांना माहूल येथे पीएपीची घरे देण्याचे मान्य करण्यात आले आहे. परंतू या झोपडी धारकांचे पुनर्वसन हि धोरणात्मक बाब असल्याचे एमएमआरडीएचे म्हणणे आहे. सन २००८ पासून नगर विकास विभाग आणि रेल्वे बोर्डाकडे याबाबतचा प्रस्ताव प्रलंबित आहे. यामुळे सन २००८ पासून या झोपडीधारकांचे अद्याप पुनर्वसन झालेले नाही. १४५४ झोपडी धारकांच्या पुनर्वसनाबाबत शासनाने योग्य असा निर्णय घेतला नसल्याने रेल्वे प्रशासन या झोपडी धारकांवर सातत्याने कारवाई करत आहे. 

राज्य सरकार, केंद्र सरकार यांचे लक्ष केंद्रित करण्यासाठी खासदार राहुल शेवाळे, गोपाळ शेट्टी, तत्कालीन खासदार एकनाथ गायकवाड इत्यादी लोकप्रतिनिधीनी पत्रव्यवहार केला आहे. तरीही सरकार या झोपडी धारकांचे पुनर्वसन करण्यास दुर्लक्ष करत असल्याने रहिवाशी संघाच्या वतीने आझाद मैदानात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन बाबुराव कोळी, शंकर पाल, अनंत कांबळे, पारसनाथ गुप्ता, नामदेव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले असून यावेळी एलफिस्टन ते दहिसर येथील रहिवाशी शेकडोंच्या संखेने उपस्थित होते. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages