मुंबई - सुप्रसिध्द साहित्यिक फादर फ्रान्सीस दिब्रेटो आणि अध्यात्माचे अभ्यासक कीर्तनकार मारोती महाराज कुऱ्हेकर यांना अनुक्रमे २०१३-१४ आणि २०१४-१५ या वर्षासाठीचे ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार राज्य शासनाने केले आहेत. संत साहित्यावर उत्कृष्ट साहित्य लिहिणा-या किंवा संतांना अभिप्रेत मानवतावादी कार्य करणा-या महनीय व्यक्तीला ज्ञानोबा तुकाराम पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी ही घोषणा आज येथे या पुरस्कारांची घोषणा केली.
या पुरस्काराचे स्वरुप रुपये ५ लाख रोख, मानपत्र तसेच मानचिन्ह असे पुस्काराचे स्वरुप असून हा पुरस्कार या यापूर्वी रा. चिं. ढेरे, डॉ.दादा महाराज मनमाडकर, जगन्नाथ महाराज नाशिककर, रामकृष्ण महाराज लहवितकर, डॉ. यु. म. पठाण व प्रा. रामदास डांगे यांना प्रदान करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली सय्यद भाई, भास्करराव आव्हाड, चैतन्य महाराज देगलूरकर, डॉ.प्रशांत सुरु, सिसिलिया कर्व्हालो आणि गुरुप्रसाद पाखमोडे हे सदस्य असलेल्या समितीने दिब्रेटो आणि कुर्हेकर यांची या पुरस्कारासाठी निवड केली.
लेखक, साहित्यिक व विचारवंत फादर फ्रान्सीस दिब्रेटो यांनी बायबलचे सटीप मराठीत रुपांतर केले असून त्यांना यासाठी राष्ट्रीय साहित्य पुरस्काराने यापूर्वीच सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील संतांच्या कार्याचा त्यांचा गाढा अभ्यास असून विशेषत: मराठी भाषेसाठी त्यांनी केलेले कार्यही वाखाणले जाते. हिंदू, बौद्ध, इस्लाम, जैन आदि धर्मसंस्कृतीचाही त्यांनी अभ्यास केला आहे.
मारोती महाराज कुऱ्हेकर यांनी वयाच्या तेवीसाव्या वर्षी शालेय शिक्षण संपवून १९५६ साली अध्यात्मिक ओढीने आळंदी येथे जोग महाराज संस्थापित वारकरी शिक्षण संस्थेत प्रवेश घेतला. स्वत: कीर्तनाचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेऊन त्यात पारंगत झाल्यानंतर ते स्वत: अध्यापकाच्या भूमिकेतून अध्यात्मिक विद्यादानाचे कार्य नि:स्पृहपणे करत आहेत. अध्यापनाबरोबर कीर्तन, प्रवचनाच्या माध्यमातून आजवर विद्यार्थ्यांच्या अनेक पिढया घडविण्याचे काम पाच दशकाहून अधिक काळ करत आले आहेत. अनेक प्रबोधनकार आज त्यांच्यामुळेच समाजप्रबोधनाचे काम यथार्थतेने करत आहेत.
आषाढी एकादशीच्या औचित्यावर या पुरस्कारांची घोषणा करण्यात येत असून वरील दोनही पुरस्कार हे या मान्यवरांना स्वतंत्र कार्यक्रमाचा कालावधी निश्चित करुन सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार असल्याचे विनोद तावडे जाहीर केले