आयुक्तांच्या मनमानी कारभाराविरोधात स्थायी सामिती बैठक तहकूब - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

आयुक्तांच्या मनमानी कारभाराविरोधात स्थायी सामिती बैठक तहकूब

Share This
मुंबई । प्रतिनिधी
मुंबई महानगर पालिकेकडून नालेसफाईच्या कामाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल स्थायी समितीत सादर न करता थेट पालिकेच्या वेबसाईटवर टाकल्याने स्थायी समिती मधे नाराजी व्यक्त करण्यात आली. स्थायी समितीला विश्वासात न घेता आयुक्तांच्या आदेशाने चौकशीचा अहवाल वेबसाईटवर टाकल्याने आयुक्तांच्या मनमानी करभाराबाबत संताप व्यक्त करण्यात येवून विरोधी पक्ष नेते देवेन्द्र आम्बेरकर यांनी सभातहकुबीची सूचना केली. या सुचनेला सर्वच पक्षाच्या सदस्यानी पाठिंबा दिल्याने स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी स्थायी समिती ची सभा तहकूब केली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages