बेपत्ता मुलांचा शोध लावण्यात पोलिसांना यश - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बेपत्ता मुलांचा शोध लावण्यात पोलिसांना यश

Share This
मुंबई : मुंबईत व्यक्ती हरवण्याचे प्रमाण मोठे असल्याचे हरवलेल्या व्यक्तींच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. मात्र मुंबई पोलिसांनी हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबवून सहा महिन्यांच्या कालावधीत शहरातून हरवलेल्या ४१८ मुलांपैकी ४१८ मुलांचा, तर ६२१ हरवलेल्या मुलींपैकी ६१५ मुलींचा शोध लावण्यात यश मिळवले आहे.
 
कुटुंबीयांच्या त्रासाला वा इतर कारणावरून घर सोडून जाणार्‍या मुला, मुलींचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले. मनासारखे होत नसल्याचे, पालकांची दहशत अशा कारणांमुळे काहीजण घराचा त्याग करतात. असाच प्रकार ज्येष्ठ महिला व पुरुषांतदेखील दिसून आला आहे. घरच्या वादाला कंटाळून, तर काही जण फिरण्यासाठी बाहेर पडल्यानंतर त्यांना घरी परतण्यात अडचण होते. ते घरचा पत्ता विसरून जातात. ते भटकंती करीत बेपत्ता होतात. त्यांच्या घरच्यांकडून नंतर ते हरवल्याची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात येते. अशा बेपत्ता, हरवलेल्या व्यक्तींची आकडेवारीचा गेल्या सहा महिन्यांचा आकडा ५८९४ एवढा असून त्यापैकी मुंबई पोलिसांनी ५0७५ व्यक्तींचा शोध लावण्याची कामगिरी केली आहे.शहरात मुले, मुली, पुरुष, महिला यांची हरवण्याची संख्या फोर मोठी असल्याचे निदर्शनास आले. यानंतर मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी प्रत्येक पोलीस ठाण्यातील पोलिसांचे हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नेमले व त्यांच्या विभागात हरविलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याची कामगिरी त्या पथकातील पोलिसांवर सोपवली. त्यानंतर अल्पावधीतच या मोहिमेला चांगले यश येऊ आले आहे.  

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages