मुंबई : प्रतिनिधी
भांडुप येथील सावित्रीबाई फुले प्रसूतीगृहातील डॉ. खरात आणि रुग्णवाहिकेचा परिचर विष्णू गवस यांच्या वाढत्या दहशतीला तेथील परिचारिका कमालीच्या घाबरल्या असून त्यांच्याकडून आमचीही अरुणा शानबागसारखी स्थिती होईल, अशी कैफियत येथील परिचारिकांनी सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांच्याकडे व्यक्त केली. विश्वासराव यांनी यासंबंधी हरकतीचा मुद्दा मांडल्यावर, त्यांना अन्य सदस्यांनीही पाठिंबा दिला. खरात आणि गवसला तात्काळ आवरा नाही तर त्यांना शिवसेना स्टाईलने सरळ करू, असा इशारा विश्वासराव आणि किशोरी पेडणेकर यांनी दिला.
डॉ. खरात या प्रसूतीगृहात गेली १८ वर्षे काम करत असून माझे ऐकले नाहीत तर तुमचीही अरुणा शानबाग करेन, अशा धमक्या देतो. त्याच्या या धमक्यांनी आम्हाला दहशत वाटते आणि तो आमचाही अरुणा शानबाग करेल, अशी भीती वाटते, असे परिचारिकांनी मला भेटून सांगितल्याचे विश्वासराव यांनी सांगितले. या रुग्णालयात सर्व वैद्यकीय सामान असतानाही डॉ. खरात रुग्णांना बाहेरून सामान आणण्यास भाग पाडतो आणि एखादे सामान वा वस्तू रुग्णालयात उपलब्ध आहे, असे परिचारिकांनी सांगितल्यानंतर खरात आम्हाला निलंबित करण्याच्याही धमक्या देतो, अशी त्यांची तक्रार आहे, असे विश्वासराव यांनी समितीमध्ये सांगितले. पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांच्याकडेही याबद्दल तक्रार करूनही त्या दखल घेत नाहीत, असेही त्या म्हणाल्या. पालिका प्रशासनाने डॉ. खरातची तात्काळ बदली करावी आणि आठ दिवसांत काहीच कारवाई झाली नाही, तर शिवसेनेच्या स्टाईलने डॉक्टरवर कारवाई केली जाईल, असा इशारा किशोरी पेडणेकर यांनी दिला. असा व्यवहार करणार्या डॉक्टरला तात्काळ हटवण्याचे निर्देश स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे यांनी पालिका प्रशासनाला दिले.