कोर-टलरोडसाठी लोकांच्या सुचना व हरकती मागवण्यासाठी एक महिन्याची पुन्हा पालिकेची मुदत वाढ - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कोर-टलरोडसाठी लोकांच्या सुचना व हरकती मागवण्यासाठी एक महिन्याची पुन्हा पालिकेची मुदत वाढ

Share This
मुंबई सोमवार ( प्रतिनिधी ) - नरीमन पॉइंट ते कांदिवली जंक्शनपर्यंतचा प्रस्तावित मुंबई सागरी मार्ग  (कोस्टल मार्ग) प्रकल्प पालिकेने हाती घेतला असून या प्रकल्पासाठी लोकांच्या सूचना व हरकती नोंदवण्यासाठी पालिकेने एक महिन्याची मुदत दिली होती ती मुदत आज 27 जुलैला संपल्याने पालिकेने लोकांना पुन्हा सूचना व हरकती दाखल करण्यासाठी एक महिन्याची मुदत वाढ देण्याचा निर्णय घेतला आहे ही मुदत 27 ऑगस्ट पर्यंत देण्यात आली आहे मागील एक महिन्यात फक्त 148 लोकांच्या सुचना व हरकती आल्या होत्या याला लोकांचा प्रतिसाद कमी मिळाल्याने पालिकेने हा पुन्हा निर्णय घेतला आहे

नरिमन पॉइंट ते कांदिवली जंक्शनपर्यंतचा प्रस्तावित मुंबई सागरी मार्ग रस्त्याचा प्रस्ताव मुंबई महापालिकेने जनतेसाठी खुला केला आला आहे. नागरिकांकडून त्यावर हरकती -सूचना मागवण्यासाठी पालिकेने 26 जून ते 27 जुलै पर्यंत मुदत दिली होती ती ही मुदत आज 27 जुलैला संपल्याने पालिकेने लोकांना पुन्हा एकदा एक महिन्याची मुदत देण्याचा निर्णय घेतला आहे.27 जुलै ते 27 ऑगस्ट पर्यंत लोकांनी या कालावधीत आपल्या सुचना व हरकती नोंदवण्याची डेडलाईन पालिकेने दिली आहे. गेल्या महिन्यात लोकांच्या सुचना व हरकती कमी आल्याने आणि लोकांचा तेवढा प्रतिसाद न मिळाल्याने पालिकेने हा पुन्हा निर्णय घेतला आहे.आता या महिन्यात किती प्रतिसाद मिळणार हे लवकरच कळेल या कोर-टलरोडबाबत काय काय सुचना व हरकती येणार हे पण लवकरच कळणार आहेत 26 जून ते 27 जुलै पर्यंत या एका महिन्यात 148 लोकांनी सुचना व हरकती नोंदवल्या आहेत यामध्ये वसई आणि विरारच्या लोकांनी जास्त प्रतिसाद दिला या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या समुद्र किनारच्या लोकांना व्यवस्थित चांगल्या ठिकाणी त्यांचे पुनर्वसन करावे हीच मागणी जास्त लोकांनी आपल्या सुचना व हरकती मध्ये नोंदवल्या आहेत                   या प्रकल्पाचा प्रस्ताव पालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे   

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages