वृत्तपत्र विक्रेत्याला अखेर न्याय मिळणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

वृत्तपत्र विक्रेत्याला अखेर न्याय मिळणार

Share This
मुंबई / ७ जुलै २०१५ / रशिद इनामदार 
मानखुर्द रेल्वे स्थानकामध्ये इमान राजन नाडर यांचा वृत्तपत्र विक्रीचा स्टॉल आहे. त्यांच्याकडून ट्रॉम्बे पोलिस ठाण्यामध्ये कार्यरत असलेले पोलिस शिपाई सुनील तानाजी कांबळे फुकटात पोलिसी धाक दाखवून वृत्तपत्र घेऊन जात होते. हा प्रकार जवळ जवळ सहा-सात महिने चालला. अखेर वैतागून इमान नाडर  ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात सुनील तानाजी कांबळे यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी गेले. कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी ही वैयक्तिक बाब आहे तुम्ही आपसात मिटवून घ्या असे बोलून बोळवण केली. इमान नाडर यांनी सिटिजन ग्रिवनन्स एस एम एस सेल च्या माध्यमातून मुंबई पोलिस आयुक्त राकेश मारिया यांच्याकडे न्याय मागितला. तेंव्हा ट्रॉम्बे पोलिसांना या प्रकरणी लक्ष घालावेच लागले.

ट्रॉम्बे पोलिसांनी मग इमान नाडर यांना आदरपूर्वक पोलिस ठाण्यात नेले त्यांचे म्हणणे ऐकून घेतले व चौकशीला सुरुवात केली. पोलिस शिपाई सुनील कांबळे याला याबाबत माहिती मिळताच त्याने मानखुर्द रेल्वे स्टेशन गाठले. इमान नाडर ची हात जोडून माफी मागितली. तक्रार मागे घेण्यासाठी विनवणी केली. पैशांचे आमिष देखील दाखवले. इमान नाडर यांना न्याय हवा होता. त्यामुळे त्यांनी कांबळेकडे त्यांनी दुर्लक्ष केले. चौकशी सुरु झाल्यानंतर कांबळे फरार झाल्याचे समोर आले होते. ट्रॉम्बे पोलिसांनी चौकशी अंती सुनील कांबळे कासुरदार असल्याचा निष्कर्ष काढला आहे. चौकशीत कासुरदार असल्याचा अहवाल वरिष्ठांना सोपवला आहे. ते ठरवतील सुनील कांबळे यांना या गुन्ह्याबद्दल काय शिक्षा द्यावी. एक गोष्ट यातून स्पष्ट झाली वृत्तपत्र विक्रेता इमान नाडर यांना या संघर्षानंतर न्याय नक्कीच मिळणार. 



Post Bottom Ad

JPN NEWS

Pages