मुंबई : येत्या १ ऑगस्टपासून बेस्ट उपक्रमाच्या बसमार्गात काही बदल करण्यात येणार आहेत. यामध्ये नवीन बसमार्ग, काही बसमार्गाचा विस्तार करण्यात येणार आहे. तर ज्या बसमार्गावर प्रवाशांची संख्या कमी आहे त्या मार्गावरील बसेस बंद करण्यात येणार आहेत.
ग्रॅण्ट रोड रेल्वे स्थानक ते कंबाला हिल टपाल कार्यालयदरम्यान बसमार्ग क्र.१५५, गोरेगाव स्थानक ते नागरी निवारा परिषद येथील आयटी पार्कदरम्याम बसमार्ग क्र.४३६, दामुनगर मालाड ते लिंक रोडदरम्यान बसमार्ग क्र.६३४, मानखुर्द स्थानक ते नानावाडीदरम्यान बसमार्ग क्र.६७८ या मार्गावर नवीन बसमार्ग चालविण्यात येणार आहेत. पंडित पलुस्कर चौक ते अंधेरी स्थानकदरम्यान चालविण्यात येणारी बस क्रमांक ८४ र्मया. आता हुतात्मा चौक ापर्यंत, वरळी आगार ते चेंबूर वसाहतदरम्यान चालविण्यात येणारी बस क्रमांक ४६३ आता एमएमआरडीए-वाशीनाकापर्यंत, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक ते घाटकोपरदरम्यान चालविण्यात येणारी वातानुकूलित बस एएस-९ आता पंतनगरमार्गे घाटकोपर आगारापर्यंत चालविण्यात येणार आहे.
पं. पलुस्कर चौक आणि मंगलदास मार्केटदरम्यान वतरुळाकार सेवेत प्रवर्तित होणारा बसमार्ग क्रमांक १२0 यापुढे स.का. पाटील उद्यान आणि मंगलदार मार्केटदरम्यान, वांद्रे स्थानक आणि खार स्थानकदरम्यान चालविण्यात येणारा बसमार्ग २१६ यापुढे वांद्रे स्थानक ते च्युंईमगाव दरम्यान, पी.एम.जी.पी. वसाहत, मुलुंड आणि टिकुजीनीवाडी-ठाणेदरम्यान चालविण्यात येणारा बसमार्ग क्रमांक ४८३ हा पवारनगर बस स्थानक येथून पी.एम.जी.पी. वसाहतदरम्यान, मागाठाणे आगार आणि लक्ष्मी पार्क (मीरा रोड) दरम्यान चालविण्यात येणारा बसमार्ग ७१२ या पुढे दहिसर बस स्थानक व लक्ष्मी पार्क (मीरा रोड) दरम्यान चालविण्यात येणार आहे. तसेच सांताक्रुझ स्थानक ते धारावी आगारदरम्यान चालविण्यात येणारा बसमार्ग क्रमांक ६१५ आणि दिंडोशी ते मिलेनिअम बिझनेस पार्कदरम्यान चालविण्यात येणारा बसमार्ग क्रमांक एएस ५२५ प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे बंद करण्यात येणार आहे, याची प्रवाशांनी नोंद घ्यावी आणि आपला प्रवास सुरू करावा, असे आवाहन बेस्ट प्रशासनाने केले आहे.