मुंबई : लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील प्रवाशांच्या आरक्षणाचा तक्ता घेऊन तिकीट तपासताना टीसीची दमछाक होते. या त्रासापासून टीसींना मुक्त करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या लांबलचक तक्त्याऐवजी एक छोटेसे यंत्र येत्या काही महिन्यांमध्ये टीसींकडे देण्यात येणार आहे. पीआरएस (प्रवासी आरक्षण केंद्र) च्या अत्याधुनिक यंत्रणेकडून मिळणारी यादी थेट या यंत्रावर दिसणार आहे.
लांब पल्ल्याच्या मार्गावरील गाड्यांमध्ये गाडी सुटण्यापूर्वी काही तास अगोदर प्रवासी यादीचा तक्ता लावण्यात येतो. त्यात आरक्षित तिकिटांची यादी दिली जाते. ही यादी डब्याच्या बाहेरही लावण्यात येते. मात्र पावसाळय़ात या यादीप्रमाणेच टीसींकडील कागदी यादीदेखील खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे परेने डिजिटल इंडियाच्या अंतर्गत अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर क रण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या मशिनद्वारे टीसींना प्रवाशांची यादी पाहता येणार आहे. त्यामध्ये झालेले अंतिम बदलही दिसणार आहेत. तसेच रिकाम्या जागांची माहिती भरून प्रतीक्षा यादीवरील प्रवाशांना तत्काळ सामावून घेण्याची माहितीदेखील पुरवता येणार आहे. ही प्रणाली येत्या काही महिन्यांमध्ये कार्यान्वित करण्यात येणार आहे. ही प्रणाली सर्वात प्रथम राजधानी एक्स्प्रेस, शताब्दी एक्स्प्रेस सारख्या गाड्यांमध्ये वापरली जाणार आहे. त्यानंतर इतर गाड्यांमध्ये या प्रणालीचा वापर केला जाणार आहे.तसेच पेपरलेस मोबाईल तिकिटांसाठी इस्रोतर्फे उपग्रहाच्या सहाय्याने करण्यात आलेल्या रेल्वे मार्ग मोजणीचा फायदा यामध्ये होणार आहे. संपूर्ण मार्गाचे आरेखन या पद्धतीने झाल्याने जवळपास सर्वच ठिकाणी पीआरएसतर्फे तत्काळ माहितीची देवाणघेवाण करता येणे शक्य होणार आहे.