जोगेश्वरी ते दहिसर विभागातील नागरिकांच्या वाहनांच्या नोंदणीसाठी स्वतंत्र जकात संकलन व्यवस्था - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

जोगेश्वरी ते दहिसर विभागातील नागरिकांच्या वाहनांच्या नोंदणीसाठी स्वतंत्र जकात संकलन व्यवस्था

Share This
मुंबई ( प्रतिनिधी ) -: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जकात विभागातर्फे बोरिवली सी. टी. एस. ५३/४, महापालिका मार्ग डेपो इमारत, कांदरपाडा, दहिसर (पश्चिम),  येथे ०२ जुलै,२०१५ पासून वाहनांच्या जकातीची वसुली करण्यासाठी जकात संकलन केंद्र सुरु करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या प्रादेशिक परिवहन विभागातर्फे जोगेश्वरी ते दहिसर या विभागातील नागरिकांच्या वाहनांची नोंदणी करण्यासाठी सदर कार्यालयात स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून जकात विभागाने नागरिकांच्या सोयीसाठी त्याच इमारतीत जकात संकलनाचीही स्वतंत्र व्यवस्था केली असल्याचे महानगरपालिकेने कळविले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages