मुंबई / प्रतिनिधी - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कारभाराची तुलना हुकूमशहा हिटलरशी करण्याचे वक्तव्य मुंबईच्या (वादग्रस्त) महापौर स्नेहल आंबेकर यांना चांगलेच महागात पडले आहे. आपल्या नेत्याची तुलना हिटलरशी केल्याने संतप्त झालेल्या महापालिकेतील भाजपच्या गटनेत्यांसह सर्व नगरसेवकांनी मंगळवारी महापौरांच्या दालनाबाहेर दोन तास धरणे दिले आणि 'महापौर माफी मागा नाही तर खुलासा द्या, अशी जोरदार मागणी केली. मात्र हा प्रकार सुरू असताना महापौर पालिका मुख्यालयात उपस्थित नसल्याने भाजप नगरसेवकांनी तेथेच ठाण मांडले. भाजपच्या या दबाव तंत्रामुळे महापौरांनी माफी न मागता, यावर खुलासा देण्याचा मार्ग पत्करला असला तरी महापौर नसताना भाजपाने स्टंटबाजी केल्याची चर्चा पालिका मुख्यालयात सुरु आहे.
'मी पंतप्रधान मोदी यांच्या कामांची प्रशंसक आहे, पण त्यांच्या कारभारात मला हिटलरशाही दिसते, असे विधान महापौरांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केल्यामुळे, महापालिका मुख्यालयात पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटले. महापौरांनी सोमवारी यावर काहीच खुलासा न केल्यामुळे भाजपचे गटनेते मनोज कोटक, शिक्षण समितीच्या अध्यक्षा रितू तावडे, सुधार समितीचे अध्यक्ष प्रकाश गंगाधरे, समितीच्या माजी अध्यक्षा उज्जवला मोडक यांच्यासह भाजपच्या नगरसेवकांनी मुख्यालयातील महापौर दालनावर 'मोर्चा' नेऊन तेथेच धरणे धरले. पण हा प्रकार होताना आंबेकर पालिका मुख्यालयात उपस्थित नव्हत्या. त्यांच्या अनुपस्थितीत 'महापौर माफी मागा नाही तर खुलासा द्या', अशी जोरदार मागणी लावून धरली. महापौर मुख्यालयात परतणार नाहीत, असे भाजपच्या गटनेत्यांना सांगितल्यावर कोटक यांनी थेट महापौरांशी संपर्क साधला आणि त्यांच्याकडून तात्काळ माफीनाम्याची किंवा खुलासा देण्याची मागणी केली. खुलासा देण्याची भाजपची मागणी महापौरांनी मान्य केली व सायंकाळी खुलासा जारी केला.
'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात मी जे बोललेच नाही, त्याचा शब्दच्छल करून 'पराचा कावळा' करण्याचे उद्योग विरोधी पक्षातल्या सदस्यांकडून होत आहेत. हा तर विपर्यासाचा अतिरेकच म्हणावा लागेल. पंतप्रधानांबद्दल माझ्या मनात पूर्ण आदर आहे आणि चुकूनही त्यांच्याबाबत कोणतेही अपमानजनक वाक्य मी कधीही बोलले नाही आणि बोलणारही नाही. विरोधकांचा हा डाव सहकारी मित्रांनीही ओळखावा आणि त्यांच्या जाळ्यात अडकू नये, असा खुलासा महापौरांनी सायंकाळी उशिरा प्रसिद्ध करून, वादावर पडदा पाडला आहे.