मुंबई : मीरा भाईंदर येथील राघवेंद्र दुबे या पत्रकाराच्या हत्येमागे बार माफियांचा हात असून दुबे यांना माहितीसाठी फोन करणाऱ्या सुहास बावचेया मीरा भाईंदरच्या पोलीस उपअधिक्षकांनाही त्वरीत निलंबित करावे, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनीकेली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: त्या मृत पत्रकाराच्या कुटंुबियांची भेट घेऊन त्यांना त्वरित आर्थिक मदत जाहीरकरावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
शुक्रवारी मीरा भाईंदर येथे एका लेडीज बारवरील पोलीस कारवाईचे वृत्त देण्यासाठी गेलेल्या राघवेंद्र दुबे या पत्रकारावर हल्लेखोरांनीजीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यात दुबे हे मृत्यूमुखी पडले. त्यांच्या मृत्यूबाबत हळहळ व्यक्त करत संजय निरूपम म्हणाले की, मी स्वत: एक पत्रकार आहे. त्यामुळे पत्रकार अनेकदा कसे आपला जीव धोक्यात घालून काम करतात याची आपल्याला पुर्ण कल्पना आहे. अशा प्रसंगात पत्रकारांनी एकमेकांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे. पत्रकारांच्या संरक्षणासाठी सक्षम कायद्याचीगरज असून सरकारने त्यात तातडीने लक्ष घालावे असे सांगत आपण या मुद्द्याचे राजकारण करत आहोत असा आरोप होण्याची शक्यताआहे, मात्र तरीही पत्रकारांच्या पुढाकाराने सुरू केलेल्या या लढ्याला आपला पुर्ण पाठींबा असल्याचे मा. निरूपम यांनी सांगितले.

मीरा भाईंदर येथे झालेल्या पत्रकाराच्या मृत्यूची बाब गंभीर असून याबाबत आपण लवकरच राज्याच्या पोलीस महासंचालकांची भेटघेऊन या प्रकरणी तपासाला वेग देण्याची विनंती करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. मुख्यमंत्र्यांनी या घटनेची दखलघेण्याची गरज अाहे. पत्रकारांचे संरक्षण, त्यांच्या नोकऱ्यांचे प्रश्न या विषयात लक्ष घालण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांनी दुबेकुटुंबियांची व्यक्तीश: भेट घेऊन त्यांना तातडीने २५ लाखांची आर्थिक मदत करावी, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच या प्रकरणातील गुन्हेगारांना त्वरीत शासन करण्यास मुख्यमंत्र्यांनी प्राधान्य दिले पाहिजे अशी मागणी संजय निरूपम यांनी केली.