मुंबई - आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते, रिपब्लिकन पक्षाच्या गवई गटाचे संस्थापक, अध्यक्ष रा.सु.गवई यांचे शनिवारी दुपारी निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. नागपूरच्या खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागच्या काही महिन्यांपासून गवई यांची प्रकृती ढासळली होती. नागपूरच्या कृष्णा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. गवई यांनी बिहार आणि केरळ या दोन राज्यांचे राज्यपालपदही भूषवले होते.
गवई यांनी महाराष्ट्रातून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती. महाराष्ट्राच्या राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या नेत्यांपैकी ते एक होते. १९६४ ते १९९४ अशी तीस वर्ष ते महाराष्ट्राच्या विधानपरिषदेचे सदस्य होते. १९६८ ते १९७८ या काळात ते विधानपरिषदेचे उपसभापती होते. १९७८ ते ८४ अशी सहावर्ष त्यांनी विधापरिषदेचे सभापतीपद भूषवले. १९८६ ते ८८ अशी दोनवर्ष ते विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते होते. १९९८ मध्ये ते अमरावती लोकसभा मतदारसंघातून १२ व्या लोकसभेवर निवडून गेले. २००६ ते २००८ अशी दोन वर्ष ते बिहारचे राज्यपाल होते त्यानंतर २००८ ते २०११ अशी तीन वर्ष त्यांनी केरळचे राज्यपालपद भूषवले.
खा.शरदचंद्र पवार, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते श्री. रा. सु. गवई यांची आज प्रदीर्घ आजाराने प्राणज्योत मावळल्याचे समजले आणि एक पुरोगामी विचाराचे मोठे नेतृत्व हरपल्याच्या जाणिवेने मनाला अत्यंत दु:ख झाले. रा. सु. गवई साहेब यांच्याशी माझा अनेक वर्षांपासून जवळचा स्नेह होता. महाराष्ट्र विधीमंडळात अनेक वर्षे आम्ही एकत्र होतो. त्याचप्रमाणे लोकसभेमध्येही ते माझे सहकारी होते. संसद व महाराष्ट्र विधिमंडळातील कारकीर्दीत त्यांनी पुरोगामी विचार व तळागाळातील जनतेचे प्रश्न हिरीरीने मांडले. रा. सु गवईनी केरळ व बिहार राज्यांच्या राज्यपाल पदाची जबाबदारीही उत्तमरीत्या पार पाडली. त्यांनी आपल्या कारकीर्दीत सामाजिक, प्रशासकीय क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटविला. त्यांच्या मृत्यूने महाराष्ट्र एका कुशल संघटकास, अभ्यासू व पुरोगामी नेतृत्वास मुकला आहे. संसदीय लोकशाहीची प्रतिष्ठा ठेवून उपेक्षितांच्या हितासाठी उभ्या आयुष्यभर कष्ट करणाऱ्या नेत्याच्या जाण्याने पुरोगामी चळवळीचे, उपेक्षितांचे न भरून येणारे नुकसान झाले आहे.
रामदास आठवले
गवई यांनी महाराष्ट्रातून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती. महाराष्ट्राच्या राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या नेत्यांपैकी ते एक होते. १९६४ ते १९९४ अशी तीस वर्ष ते महाराष्ट्राच्या विधानपरिषदेचे सदस्य होते. १९६८ ते १९७८ या काळात ते विधानपरिषदेचे उपसभापती होते. १९७८ ते ८४ अशी सहावर्ष त्यांनी विधापरिषदेचे सभापतीपद भूषवले. १९८६ ते ८८ अशी दोनवर्ष ते विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते होते. १९९८ मध्ये ते अमरावती लोकसभा मतदारसंघातून १२ व्या लोकसभेवर निवडून गेले. २००६ ते २००८ अशी दोन वर्ष ते बिहारचे राज्यपाल होते त्यानंतर २००८ ते २०११ अशी तीन वर्ष त्यांनी केरळचे राज्यपालपद भूषवले.
शोक संदेश -
आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते श्री. रा. सु. गवई यांची आज प्रदीर्घ आजाराने प्राणज्योत मावळल्याचे समजले आणि एक पुरोगामी विचाराचे मोठे नेतृत्व हरपल्याच्या जाणिवेने मनाला अत्यंत दु:ख झाले. रा. सु. गवई साहेब यांच्याशी माझा अनेक वर्षांपासून जवळचा स्नेह होता. महाराष्ट्र विधीमंडळात अनेक वर्षे आम्ही एकत्र होतो. त्याचप्रमाणे लोकसभेमध्येही ते माझे सहकारी होते. संसद व महाराष्ट्र विधिमंडळातील कारकीर्दीत त्यांनी पुरोगामी विचार व तळागाळातील जनतेचे प्रश्न हिरीरीने मांडले. रा. सु गवईनी केरळ व बिहार राज्यांच्या राज्यपाल पदाची जबाबदारीही उत्तमरीत्या पार पाडली. त्यांनी आपल्या कारकीर्दीत सामाजिक, प्रशासकीय क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटविला. त्यांच्या मृत्यूने महाराष्ट्र एका कुशल संघटकास, अभ्यासू व पुरोगामी नेतृत्वास मुकला आहे. संसदीय लोकशाहीची प्रतिष्ठा ठेवून उपेक्षितांच्या हितासाठी उभ्या आयुष्यभर कष्ट करणाऱ्या नेत्याच्या जाण्याने पुरोगामी चळवळीचे, उपेक्षितांचे न भरून येणारे नुकसान झाले आहे.
मुम्बई दि25- रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ आणि श्रेष्ट नेते रा सु गवइंच्या निधनाने राजकारणाच्या पटलावर चमकणारा तेजस्वी तारा निखळला.रिपब्लिकन पक्षाच्या नव्या आणि जुन्या पिढीला जोडणारे दुवा होते अशा शब्दांत रिपाइंचे राष्ट्रिय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यानी दिवंगत रा सु गवईंना आदरांजली वाहीली
नागपुर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमि स्मारकाचे त्यांनी केलेले काम ऐतिहासिक आणि अम्बेडकरी समाजाला दिलेली उत्कृष्ट भेट आहे त्यांचे सामाजिक आणि राजकीय योगदान महत्वपुर्ण राहिली आहे विधान परिषदेचे अध्यक्ष राज्यसभा आणि लोकसभा खासदार तसेच बिहार आणि केरळचे राज्यपाल अशी विविध उच्च पदे राजकारणात भूषवूनदेखिल त्यांच्या मनात प्रौढि नव्हती अत्यंत मनमिळाऊ स्वभावचे ते नेते होते शिस्तबद्ध आणि अभ्यासु नेते होते रिपब्लिकन ऐक्यात त्यांच्याशी आपला स्नेह वाढला त्यांनी पुणे येथे रेसकोर्स मैदानावर7लाख लोकांच्या उपस्थित झालेल्या अधिवेशनात माझ्यासारख्या फिल्डवरकरला रिपाइंचे अध्यक्ष पद बहाल केले
त्यांच्याशी आपले कौटुम्बिक सम्बन्ध होते समाजकारणात राजकारणात नव्या पिढीचे ते मार्गदर्शक होते आंबेडकरी चलवळीत त्यांचे भरीव योगदान राहिले आहे त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीचे कधीही भरून येणार नाही असे नुकसान झाले आहे त्याना रिपाइंच्या वतीने निळा सलाम करुन खासदार रामदास आठवलेंनी दिवंगत रा सू गवईंना आदरांजलि वाहिलि उद्या अमरावती येथे दिवंगत रा सु गवइंच्या अंत्यविधिस आठवले उपस्थित राहणार आहे
डॉ.नितीन राऊत, माजी मंत्री (म.रा.)
आपल्या मृदूस्वभावाने शत्रुंवर मात करणारे, आंबेडकरी चळवळीचे खरे सेनानी माजी राज्यपाल, माजी खासदार रा.सु.गवई यांच्या निधनाने दलित समाजाचीच नव्हे तर, बहुजन, गोरगरीब,मागासवर्गाची मोठी हानी झाली आहे. पाच दशके राजकारणात राहून उतुंग असे दीक्षाभूमीचे स्मारक उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. उत्कृष्ट संसदपटू म्हणून त्यांचेी कारकीर्द कायम स्मरणात राहणारी आहे. भूमीहीनांचे आंदोलन असो की, चळवळीला बळ देण्याचे कार्य त्यांचे नेतृत्व इतरांसाठी प्रेरणादायी ठरले. विधीमंडळात असतांना त्यांनी लोकप्रतिनीधींना जनतेच्या प्रश्नावर भांडण्याची प्रेरणा दिली. राज्यपाल म्हणून बिहारमध्ये त्यांनी केलेल्या कार्याचा आजही गौरव करण्यात येतो. लोकसभा,राज्यसभा आणि विधीमंडळ अशा सर्वच संसदीय प्रणालीत नेतृत्व करण्याची संधी त्यांना मिळाली. याचा वापर त्यांनी मागास समाज व जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी हत्यार म्हणून वापरले. त्यांच्या स्पष्टपणा, प्रखर वक्तृत्वाचा धसका सत्ताधाऱ्यांनीही घेतला. विधानपरिषदेचे सभापती म्हणून सरकारला चूकीचे निर्णय मागे घेण्यास बाध्य करणाऱ्या त्यांच्या शैलीमुळे आजही अनेक विभाग लोकहिताच्या योजना राबवित आहे. त्यांच्या रूपाने चळवळीचे एक उत्तुंग नेतृत्व, गरीब,दलित व मागास समाजाचा चेहरा हरपला आहे. त्यांना माझ्यातर्फे श्रध्दांजली.
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ
रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा केरळ राज्याचे माजी राज्यपाल रा.सु.गवई यांच्या निधनामुळे फुले-आंबेडकरी विचारांचा खंदा पुरस्कर्ता हरपला अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
आपल्या शोक संदेशात छगन भुजबळ यांनी पुढे म्हटले आहे की, नागपूर येथे ज्या ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली त्या दीक्षाभूमीवर बौद्धस्तूप तसेच सदर भूमीवर विविध पायाभूत सुविधा साकारण्यासाठी त्यांनी आपली पूर्ण शक्ती पणाला लावून दीक्षाभूमीचा विकास केला. आंबेडकरांचे साहित्य विविध भाषांमध्ये रुपांतरीत करून प्रकाशित करण्यात रा.सु.गवई यांचे मोलाचे योगदान होते. ते महाराष्ट्र विधान परिषदेचे अखंड तीस वर्ष सभासद होते. त्यांनी महाराष्ट्र विधान परिषद सभापती, उपसभापती, महाराष्ट्र विधान परिषद विरोधी पक्षनेता, कॉमनवेल्थ पार्लीमेंटरी असोसिएशन महाराष्ट्र शाखेचे सयुक्त उपाध्यक्ष, त्याचबरोबर त्यांनी बिहार आणि केरळ या दोन राज्यांचे राज्यपालपदही भूषवले होते.
त्यांनी अस्पृश्यता निर्मूलन आणि कुष्ठरोग या क्षेत्रात त्यांनी भरीव कार्य केले होते. विद्यार्थी दशेपासून सामाजिक व राजकिय चळवळीत त्यांचा सक्रीय सहभाग होता. राज्यात रोजगार हमी योजना सुरु व्हावी याकरिता त्यांचे भरीव योगदान होते. लोकप्रतिनिधी या नात्याने मागासवर्गीय, उपेक्षित आणि अन्यायग्रस्तांचे तसेच कामगारांचे प्रश्न विधिमंडळात तसेच शासनाकडे पोट तिडकीने मांडणाऱ्या दलित नेत्याला महाराष्ट्र कायमचा अंतराला आहे. मी शोकाकुल अशा गवई कुटुंबियांच्या दुख:त सहभागी आहे. ईश्वर मृताच्या आत्म्यास शांती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो असे शोकसंदेशांत शेवटी म्हटले आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे
गेली 5 दशके राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात आंबेडकर, दलित, राजकीय व सामाजिक चळवळीत काम करणा-या रा. सु.गवई यांच्या निधनामुळे या चळवळीत काम करणारे एक मोठे आणि ज्येष्ठ नेतृत्व हरपले असून चळवळीचे आणि महाराष्ट्राचे ही मोठे नुकसान झाले आहे अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत.
कृषि मंत्री एकनाथराव खडसे
बिहार आणि केरळचे माजी राज्यपाल व् दलितांचे ज्येष्ठ नेते रा.सू.गवई यांच्या निधनाबद्दल कृषी मंत्री एकनाथराव खडसे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे'.गवई यांच्या निधनामुळे आंबेडकरी विचारांचा खंदा पुरस्कर्ता, ज्येष्ठ दलित नेता आणि समाजसेवक हरपला आहे.अशा शब्दात आपल्या शोक भावना व्यक्त करताना खडसे यानी पुढे म्हटले आहे की,विधि मंडळात आणि संसदेत त्यानी मोठे योगदान दिले.दलितांचे जिव्हाळ्याचे प्रश्न त्यानी पोट तिडकिने मांडले. रो.ह.यो.साकारण्यासाठी गवई यांनी दिलेले योगदान विसरता येणार नाही.सर्वांशी अत्यन्त जिव्हाळ्याचे सम्बन्ध जोपासणाऱ्या नेत्याला व् दलितांचा मोठा आधार असलेल्या समाज सेवकाला महाराष्ट्र कायमचा अंतरला आहे.मी शोकाकुल गवई कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे, असे खडसे यानी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे