खोट्या जात प्रमाणपत्राद्वारे मुख्य सुरक्षा अधिकारी पदावर पदोन्नती मिळवण्याचा डाव - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 July 2015

खोट्या जात प्रमाणपत्राद्वारे मुख्य सुरक्षा अधिकारी पदावर पदोन्नती मिळवण्याचा डाव


आयुक्तांनी चौकशी करण्याची मागणी
मुंबई / अजेयकुमार जाधव
मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य सुरक्ष अधिकारी अरुण वीर तीन महिन्यांनी निवृत्त होत असून त्या जागेवर बोगस जात प्रमाणपत्र सादर करून प्रशासनाची फसवणूक करणाऱ्या अधिकाऱ्याला नियुक्त करण्याचा  घाट  घातला जात आहे. या संदर्भात पालिका आयुक्तांनी स्वत: लक्ष घालून गैरप्रकार थांबवावा अशी मागणी मनसेचे नगरसेवक सुधीर जाधव यांनी केली आहे.
          
सध्या उपप्रमुख सुरक्षा अधिकारी पदावर कार्यरत असलेले दत्तात्र्य हरिश्चंद्र पाटील (जुने नाव पिंपळे) यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर (दिनांक ६ जून १९७६) वंजारी असल्याचा उलेख आहे. त्यानंतर त्यांनी दिनांक १७ एप्रिल १९७८ ला घेतलेल्या डुप्लीकेट शाळा सोडल्याच्या दाखल्यात वंजारी असा उल्लेख केला आहे . सन १९८१ मध्ये सहाय्यक सुरक्षा अधिकारी या पदासाठीच्या जाहिरातीच्यावेळी  त्यांनी १० ऑक्टोबर १९८१ डुप्लीकेट दाखला जातीने वंजारी (ओबीसी) असतानाही बंजारा (व्हीजेएनटी) या जातीचे असल्याचे खोटे प्रमाणपत्र प्राप्त केले. त्यामधील  शिकत असल्याच्या वर्षामधील तफावत सन १९७५ व दुसऱ्यात १९७३ असून त्यांनी त्यांचे पिंपळे हे नाव बदलून पाटील केले जेणेकरून त्यांनी बंजारा समजण्यात यावे कारण पिंपळे हे नाव बंजारा जातीत येते . त्यांच्या सख्ख्या भावाचे  जे मंत्रालयातून निवृत्त झाले ते  मोरेश्वर हरिश्चंद्र पिंपळे यांच्या शाळेच्या चारित्र्य प्रमाणपत्रामध्ये ही हिंदू वंजारी असा जातीचा  उल्लेख आहे.
                       
दत्तात्रय पाटील (पिंपळे) यांनी १२ मार्च १९८० सालचे खोटे जात प्रमाणपत्र जन्म पालघरचा  असताना कुर्ल्याचे प्रमाणपत्र घेतले. सन ६ मार्च १९५९  माजेस्तिक कोर्ट बोरीवली येथून जातीचेप्रमाणपत्र  खोटे असल्याचा संशय व्यक्त  आहे. रीट पिटीशन  ३३५४/१९८६ चा संदर्भ देताना या मध्ये संबंधित दत्तात्रय गोविंद पाटील(पिंपळे) यांचा कोणताही संबंध नसताना सादर  जजमेंट अनधिकृत स्वत: साठी वापरली.  यामध्ये अर्जदार दामोदर गोविंद पाटील हे खरे तक्रारदार आहेत. या अंतिम निकालात जातपडताळणी बाबत कोणताही स्पष्ट आदेश नाहीत.
                       
त्यांची वरील सर्व कागदपत्रे जी खोटी आहेत ती तपासून पडताळणी केल्याचा   भास निर्माण करून ती खरी असल्याचा अहवाल संबंधित वरील अधिकाऱ्यांकडून घेवून ३१ मार्च २००९ रोजी उपप्रमुख सुरक्षा अधिकारी या पदासाठी पदोन्नती मिळविली. आयुक्तांनी सीबीसी १९९१/२२२/मावक/५ दिनांक २३ मार्च १९९४ पाहून बंजारा व वंजारी या बाबतचा शासन निर्णय पाहून पाटील (पिंपळे) यांच्या जात प्रमाणपत्राची  सत्यता पाहून आयुक्तांनी कारवाई करावी अशी मागणी सुधीर जाधव यांनी केली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS