संपात डॉक्टर गैरहजर असताना चांगली सेवा दिल्याचा पालिकेचा दावा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 July 2015

संपात डॉक्टर गैरहजर असताना चांगली सेवा दिल्याचा पालिकेचा दावा


मुंबई / अजेयकुमार जाधव 
मार्डच्या संपामुळे महाराष्ट्रातील सर्वच रुग्णालयामधील रुग्णांचे हाल झाले असताना. मुंबई महानगर पालिकेच्या रुग्णालयामधील डॉक्टर मोठ्या प्रमाणात अनुपस्थीत असताना शैक्षणिक स्टाफच्या सहाय्याने रुग्णांना सेवा दिल्याचा दावा पालिकेच्या आरोग्य विभागाने केला आहे. 

वेतनवाढीच्या प्रमुख मुद्द्यांवरून राज्यातील सुमारे चार हजार निवासी डॉक्टरांनी आज, गुरुवारपासून बेमुदत संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. हा संप मागे घेण्यासाठी बुधवारी वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी 'मार्ड'च्या शिष्टमंडळाची बैठक घेतली. मात्र, वेतनवाढीच्या प्रश्नावरून ही शिष्टाई असफल ठरली. राज्यातील १७ मेडिकल कॉलेजांमधील सुमारे चार ​हजार निवासी डॉक्टर आज सकाळी आठ वाजल्यापासून संपावर गेले आहेत. इंडियन मेडिकल कौन्स‌लिने या संपाला पाठिंबा दिला आहे. त्यात, मुंबई पालिकेच्या हॉस्पिटलांसह राज्यातल्या सर्व मेडिकल कॉलेजांमधील निवासी डॉक्टर सहभागी झाले असल्याने हजारो पेशंटांचे हाल झाले. मुंबई महानगर पालिकेच्या १९२० पैकी ३५० डॉक्टरांनी आज संपाच्या दरम्यान हजेरी लावली. या संपाच्या दरम्यान ४९२६ रुग्णांवर ओपीडीमध्ये, १३८ अंतर्गत रुग्णांवर उपचार करण्यात आले, ६५ शत्रक्रिया करण्यात आल्या, ९९  शस्त्रक्रिया करण्यात आल्या, १२ प्रसूती झाल्या, १८ अन्जोग्राफी, ५ अन्जोप्लास्टी, २९ एन्डोस्कोपी, १० युरोलॉजीच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या तर ६ पोस्टमार्टम करण्यात आल्या आहेत. मुंबई महानगर पालिकेच्या रुग्णालयात दररोज हजारो लोक बाह्य विभागात उपचारासाठी येतात, शेकडो शस्त्रक्रिया केल्या जातात असे असताना १९२० पैकी फक्त ३५० डॉक्टर उपस्थित असताना रुग्णालयातील शैक्षणिक स्टाफच्या सहाय्याने महत्वाच्या सेवा सुरु असल्याचे पालिकेने कळविले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS