याकूबला इतक्यात फाशी देवू नये - भारिपच्या प्रकाश आंबेडकर यांनी केली मागणी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

याकूबला इतक्यात फाशी देवू नये - भारिपच्या प्रकाश आंबेडकर यांनी केली मागणी

Share This
मुंबई / प्रतिनिधी - मुंबईतील १९९३ च्या बाँब स्फोट मालीकेतील इतर आरोपी अद्याप हाती लागलेले नसताना याकूब मेननच्या िशक्षेच्या अंमलबजावणीस नरेंद्र मोदी सरकार अकारण घाई करत आहे. याकूबला फाशी दिल्यास या बाँबस्फोटातील अनेक दुवे कायमचे गडप होतील असा दावा करत भारिप अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी याकूबला इतक्यात फाशी देवू नये, अशी मागणी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.

मेनन बंधुंनी केलेल्या बाँबस्फोटांना १९९३ च्या मुंबई दगलीची पार्श्वभूमी होती. आजपर्यंत या बाँबस्फोटातील केवळ मुस्लीम आरोपी पकडले गेले आहेत. यातला राजकीय नेते आिण हिंदू धार्मिक नेते यांचा रोल पुढे आलेला नाही. त्या सर्वांची माहिती असणारा याकूब एकमेव आहे. त्यामुळे त्याला  इतक्यात फाशी देवू नये, असे आंबेडकर म्हणाले.

याकूबने पोलिसांकडे स्वत: होवून आत्मसर्मपण केलेले आहे. यावरुन त्याच्याकडे १९९३ च्या बाँबस्फोटसंदर्भात अिधक माहिती असली पाहिजे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून याकूबची उपयुक्तता संपलेली नाही. म्हणून याकूबला फाशी देण्याची ही योग्य वेळ नसल्याचा दावा अ‍ॅड. आंबेडकर यांनी केला.


न्यायव्यवस्थेने याकूबला फाशी देवून आपले चोख काम पार पाडले आहे. न्यायालयाच्या िशक्षेची अंमलबजावणी जरुर व्हावी. पण, देशांतर्गत परस्थिती पाहून फाशीच्या िशक्षेचा राजकीय निर्णय व्हायला हवा, असेही अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले.
जालना, मालेगाव, पुण्यातील फर्गसन रोड आिण मुंबईतील िगरगाव बाँबस्फोटात िहंदू आरोपी असल्याने याचा तपास थांबला, असा दावा करत  भारतात फाशीच्या िशक्षेत ८० टक्के आरोपी आदिवासी, दलीत आिण मुस्लीम आरोपीच कसे ? असा सवाल अ‍ॅड. आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.  


वैदिक मानसिकता
वैदीक धर्मात मृत्युदंडाची िशक्षा तळातील जातीला देण्यात येते. त्यामुळेच नरेंद्र मोदी सरकार याकूब मेनन यास फाशी देण्यास उतावीळ झाल्याचा आरोपही अ‍ॅड. आंबेडकर यांनी यावेळी केला.


लोकप्रिय निर्णयअफजल गुरुला फाशी देताना ह्ययुपीएह्ण सरकारने लोकप्रिय निर्णय घेतला. तीच पद्धत मोदी सरकार अवलंबत असून याकूबला फाशी देवून भाजप सरकार शौर्य दाखवू पाहात असल्याची िटका अ‍ॅड. आंबेडकर यांनी केली. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages