फक्त १७ टक्के स्थानकांत स्वच्छता
मुंबई / प्रतिनिधी - मुंबईची लाईफलाईन असलेली रेल्वेच प्रवाशांसाठी जीवघेणी ठरत आहे. रेल्वेचे डबे आणि फलाटांमध्ये असलेली पोकळी प्रवाशांच्या जीवाशी खेळत आहे. ९३ टक्के रेल्वे स्थानकात ही पोकळी कायम असल्याचे मनी लाईफ फाऊंडेशन या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून हि बाब उघड झाली आहे.
उपनगरी रेल्वेत दररोज लाखोंच्या संख्येने मुंबईकर प्रवास करतात. पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावरील ३0 स्थानकांचे मनी लाइफ फाऊंडेशनने सर्वेक्षण केले. यामध्ये प्रवाशांना मिळणार्या सोयीसुविधा, स्थानकांची रचना, प्रवाशांना भेडसावणार्या गैरसोयी आणि इतर बाबींचा समावेश करण्यात आला. यामध्ये रेल्वेचे डबे आणि फलाटामधील दरी अपघातास कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. घाटकोपर रेल्वे स्थानकात मोनिका मोरे या तरुणीने फलाटमधील दरीत आपले दोन्ही हात गमावले होते. या घटनेनंतर फलाट आणि डब्यातील दरीचा प्रश्न ऐरणीवर आला होता. रेल्वे प्रशासनाने या प्रकरणाची गंभीरतेने दखल घेत दरी दूर करण्याचे प्रयत्न हाती घेतले आहे. मात्र, अद्यापही या कामाला गती मिळाली नाही.
फेरीवाल्यांची संख्या दिवसेंदिवस गंभीर होत असताना रेल्वे स्थानक आणि परिसरातही त्यांनी बस्तान मांडल्याचे सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. अनेक स्थानकात दिशा निर्देशक बोर्ड अस्तित्वात नाही. मात्र, जाहिरातदारांचे मोठे बॅनर्स आढळून येतात. युनिर्व्हसिटी ऑफ वेस्टन ऑस्ट्रेलियाचे दोन विद्यार्थी रिकी व्हेला आणि लेलन एच. ट्युंग्रो यांच्या साहाय्याने हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. उपनगरी रेल्वे मोठय़ा प्रमाणावर महसूल देते. मात्र, त्या तुलनेत प्रवाशांना मिळणार्या सुविधांची बोंब आहे. या सर्वेक्षणात आढळून आलेल्या त्रुटींची दखल घेऊन रेल्वे प्रशासनाने त्या दूर कराव्यात, असे आवाहन मनी लाइफ फाऊंडेशनच्या सुचेता देसाई यांनी सांगितले. या अहवालातून रेल्वेचे खरे वास्तव समोर आले आहे. त्यानुसार प्रशासनाने पुढील पावले उचलावी, अशी प्रतिक्रिया सेफ रेल ग्रुपचे समीर झव्हेरी यांनी दिली. |
सर्वेक्षणातील महत्त्वाच्या बाबी मनी लाईफ फाऊंडेशन या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात आजही ९३ टक्के स्थानकांत डबे आणि फलाटांमध्ये पोकळी आहे. फक्त १0 टक्के स्थानकांत पोकळी भरण्याचे काम सुरू आहे. ५३ टक्के रेल्वे स्थानकांत फेरीवाले आणि भिकारी यांचा उपद्रव आहे. ५७ टक्के रेल्वे स्थानकांत ट्रॅक प्रतिबंधात्मक उपाय यंत्रणेचा अभाव आहे. ६३ रेल्वे स्थानकांच्या परिसराबाहेर रुग्णवाहिकांना स्थान उपलब्ध आहे. तर फक्त १७ टक्के स्थानकांत स्वच्छता असल्याचे समोर आले