शिव वडापावच्या गाडीजवळ आता काॅगेसची कांदापोहेची गाडी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

शिव वडापावच्या गाडीजवळ आता काॅगेसची कांदापोहेची गाडी

Share This
मुंबई ( प्रतिनिधी ) - शिवसेनेच्या जिमवरून सुरु असलेल्या कसरतीनंतर आता काँग्रेसने शिववडापावच्या जवळ मराठमोळ कांदापोहे सुरू करण्याची घोषणा करून शिवसेनेच्या शिववडापावला आव्हान दिले आहे. मुंबई महापालिकेतील काँग्रेसचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र आंबेरकर यांनी सोमवारी घोषणा केली. त्यामुळे आता शिवसेनेच्या शिववडापावच्या विरोधात काँग्रेसचे कांदापोहे असा सामना रंगणार आहे. 



गेल्या काही दिवसांपासून मुंबई महापालिकेची फेरीवाल्यांवर कारवाई सुरू आहे. मात्र याचवेळी शिवसेनेच्या संकल्पेतून उभारलेली जिम अनधिकृत असतानाही कारवाई होत नसल्याने त्याविरोधात सध्या वाद रंगला आहे. या वादात आता काँग्रेसने शिवसेनेच्या शिववडापावकडे पालिकेचे लक्ष वेधले आहे. प्रशासन अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करते मग शिवसेनेच्या अनधिकृत शिववडापावच्या स्टॉलवर का करीत नाही? शिववडापाववर कारवाई होत नसल्याने आम्ही त्यांच्याच बाजूला कांदापोहे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, असे आंबेरकर यांनी स्पष्ट केले. काँग्रेसची कांदापोहे स्टॅालची योजना तयार आहे. सात वर्षापूर्वी शिवसेनेने मराठी माणसाला रोजगार मिळावा म्हणून मराठमोळा शिववडापाव सुरू केला. अनेक ठिकाणी वडापावचे स्टॉल अनधिकृत असूनही त्यावर पालिकेने कारवाई केली नाही. तसेच शिवसेनेने स्टॅालसाठी निवडलेला वडापाव हा पदार्थ मराठमोळ नाही तर तो परप्रांतीय असल्याचेही काँग्रेसने टीका केली आहे. पालिकेची अनधिकृत वडापाव स्टॉलवर कारवाई होत नसल्यानेच या विरोधात मोहीम म्हणून काँग्रेस मुंबईतल्या तरूणांना रोजगार मिळावा यासाठी मराठमोळ कांदापोहेचे स्टाॅल उभारणार आहे, असे आंबेरकर यांनी सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages