सरकारने उचल्याकार लक्ष्मण गायकवाड यांच्यावर आणली जोगवा मागण्याची वेळ - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

सरकारने उचल्याकार लक्ष्मण गायकवाड यांच्यावर आणली जोगवा मागण्याची वेळ

Share This
महाराष्ट्र भूषण, सार्क साहित्य पुरस्कार सरकारला परत करणार 
मुंबई / प्रतिनिधी 
महाराष्ट्र गौरव पुरस्कार व सार्क देशांच्या साहित्य पुरस्काराने गौरवण्यात आलेले उचल्याकार लक्ष्मण गायकवाड यांना महाराष्ट्र शासनाने विशेष बाब म्हणून दिलेल्या जागेतून काढून टाकण्याचे करास्थान महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाकडून सुरु आहे. महाराष्ट्र राज्याचा आणि सार्क देशाचा पुरस्कार देवून गौरवण्यात आलेल्या एका साहित्तीकाला रस्त्यावर आणण्याचे कारस्थान सुरु असताना मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्री या प्रकाराकडे दुर्लक्ष करत असल्याने माझ्यावर जोगवा मागण्याची ( भिक मागण्याची ) वेळ सरकार आणत आहे अशी माहिती लक्ष्मण गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

लक्ष्मण गायकवाड यांना १९९४ मध्ये तत्कालीन सांस्कृतिक मंत्री विलासराव देशमुख यांनी उदरनिर्वाहासाठी दादासाहेब फाळके चित्रनगरीत हॉटेल व्यवसाय सुरु करण्यासाठी जागा दिली होती. या जागेवर स्वखर्चाने गायकवाड यांनी लागणाऱ्या परवानग्या घेवून हॉटेलची इमारत बांधली. या जागेसाठीचा करार सन २०१० पर्यंत ५ वर्षाचे दोन व १० वर्षाचे दोन असे चार वाढवण्यात आला. २०१० नंतर सातत्याने करार वाढवण्याची मागणी करूनही हि मागणी पूर्ण करण्यात आलेली नाही. एकीकडे करार वाढवला नसताना नव्या दरानुसार गायकवाड यांच्याकडून जास्त दराने भाडे वसुली केली जात आहे. गायकवाड यांना साहित्यात केलेल्या कामगिरीबाबत विशेष बाब म्हणून जागा दिली असून त्यावर गायकवाड यांनी आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी हॉटेल उभारले असताना महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाकडून न्यायालयाची दिशाभूल करून गायकवाड यांनी निवासस्थान खाली करावे असा आदेश मिळवला आहे अशी माहिती गायकवाड यांनी दिली. 

लक्ष्मण गायकवाड यांना सदर जागेमधून हुसकावून त्या जागेवर समोरच असलेल्या सुधाकर शेट्टी यांच्या हॉटेलला जागा देण्यासाठी महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे उपसंचालक संजय पाटील काम करत आहेत. सरकारने उदरनिर्वाह करण्यासाठी दिलेली जागा आता चित्रपट महामंडळ काढून घेत आहे. याबाबत सरकारकडे न्याय मागितल्यावर मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्री भेटीसाठी वेळ देत नसल्याचे गायकवाड यांनी सांगितले. सरकार आणि चित्रपट महामंडळाने मला रस्त्यावर आणून भिकेला लावायचे ठरवलेच असेल तर मला दिलेले महाराष्ट्र भूषण व सार्कचा दिलेला साहित्य पुरस्कार मुख्यमंत्र्यांना ताब्यात देणार असल्याचा इशारा गायकवाड यांनी दिला आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages