विद्यार्थ्यांना मोफत पास द्या - कॉंग्रेसची बेस्टकडे मागणी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

विद्यार्थ्यांना मोफत पास द्या - कॉंग्रेसची बेस्टकडे मागणी

Share This
मुंबई ( प्रतिनिधी ) - विद्यार्थ्यांच्या बेस्टच्या पासाचे पैसे पालिकेने भरावेत आणि विद्यार्थ्यांना मोफत पास द्यावेत अशी मागणी कॉंग्रेसने बेस्ट प्रशासनाकडे केली आहे. तसा प्रस्ताव तयार करून बेस्टने पालिकेकडे पाठवावाअशी सुचना बेस्ट समितीचे सदस्य रवी राजा यांनी बेस्टला केली आहे. 
                                                                              
सोमवारी (ता. 20) बेस्ट समितीच्या बैठकीत विद्यार्थ्यांच्या पासाच्या दरात कपात करण्याचा प्रस्ताव मंजूर होण्याची दाट शक्‍यता आहे. पालिकेच्या शाळेत येणारे विद्यार्थी हे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील आहेत. त्यामुळे पालिका त्यांच्या शाळांमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना 27 शैक्षणिक वस्तू दरवर्षी मोफत पुरवित आहे. पालिकेच्या शाळांची पटसंख्या रोडावत असल्याने विद्यार्थ्यांची संख्या वाढावी यासाठी या वस्तू दिल्या जात आहेत. त्याच धर्तीवर पालिकेच्या विद्यार्थ्यांना बेस्टचे मोफत पास देण्यात यावेत. नगरसेवकांना दिल्या जात असलेल्या पासाचे पैसे पालिका तर पोलीसांनाही दिल्या जाणाऱ्या पासाचे पैसे राज्य सरकार भरते. पालिकेच्या बारा हजार विद्यार्थ्यांना पालिकेने मोफत पास द्यावेत त्या पासाचे पैसे पालिकेने भरावेत. त्यासाठी बेस्ट प्रशासनाने तसेच बेस्ट समितीचे अध्यक्ष अरविंद दुधवडकर यांनी पाठपुरावा करावा अशी सुचना रवी राजा यांनी केली आहे. पालिकेच्या गटनेत्यांच्या बैठकीत त्याबाबत चर्चा करण्याचा निर्णय बेस्ट समितीत झाला होता. मात्र अद्याप त्याबाबत कोणताही पाठपुरावा झाला नसल्याचे समजते. सोमवारी होणाऱ्या बेस्ट समितीच्या बैठकीत विद्यार्थ्यांच्या पासाच्या दरात कपात करून दरमहा विद्यार्थ्यांचा पास 125 रुपये करावा असा प्रशासनाचा प्रस्ताव आहे. पासाच्या दरकपातीचा निर्णय सोमवारी होण्याची शक्‍यता आहे. विद्यार्थ्यांच्या मोफत पासाचा आग्रह कॉंग्रेसचे सदस्य बेस्ट समितीत धरतील अशी माहिती त्यांनी दिली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages