मुंबई : मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व मॉल्समधील अग्निसुरक्षा व्यवस्था तातडीने अद्ययावत करण्याचे आदेश महापालिकेचे आयुक्त अजॉय मेहता यांनी दिले आहेत. याबाबत आयुक्तांच्या आदेशानुसार पालिकेच्या विविध खात्यांमधील अधिकार्यांचे संयुक्त पाहणी पथक स्थापन करण्यात आले आहे. या पाहणी पथकाद्वारे पालिकेच्या क्षेत्रातील विविध मॉल्सची नियमित स्वरूपात पाहणी करण्यात येणार आहे.
पालिका क्षेत्रातील सर्व मॉल्समध्ये अग्निसुरक्षा व्यवस्था तातडीने अद्ययावत करण्यासोबतच अनधिकृत बांधकामे हटवणे, नियमानुसार आवश्यक असलेल्या मोकळ्या जागा (ओपन स्पेस) सोडणे, अग्निशमन यंत्रणा अद्ययावत करून घेणे, वायूविजन व्यवस्था कार्यान्वित करणे आदी सर्व संबंधित बाबी तातडीने करून घेण्याचे आदेश मेहता यांनी दिले आहेत. वांद्रे येथील केनिलवर्थमधील आगीच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली एक संयुक्त बैठक आयोजिण्यात आली होती. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख, उपायुक्त राम धस, अतिक्रमण निर्मूलने व फेरीवाल्यांचे नियमन विभागाचे उपायुक्त बापू पवार, प्रमुख अग्निशमन अधिकारी प्रभात रहांगदळे यांच्यासह विधी विभाग, सार्वजनिक आरोग्य खाते, इमारत आणि कारखाने खाते अनुज्ञापन विभाग आदींचे अधिकारी उपस्थित होते. मॉल्सच्या तपासणी पथकात मुंबई अग्निशमन दल, सार्वजनिक आरोग्य खाते, सहाय्यक अभियंता ( इमारत व कारखाने) अनुज्ञापन खाते आणि विधी विभाग आदी खात्यातील अधिकारी व कर्मचार्यांचा समावेश आहे.