मुंबई : सोशल नेटवर्किंगच्या वापरामुळे अनेक फायदे होत असतानाच याचा फायदा अपप्रवृत्तीदेखील घेत आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून करण्यात येणार्या गुन्ह्यांची संख्या वाढल्याने मुंबई पोलिसांनी सायबर क्राईम सेलची स्थापना केली. आता या सेलचा कारभार वाढल्याने साईबर क्राईम सेलला गुन्हे शाखेपासून अलिप्त करून आर्थिक गुन्हे शाखेत वर्ग करण्यात आले आहे. येत्या काळात सायबर क्राईमला अंकुश लावण्यासाठी सायबर क्राईम सेलवर मोठी जबाबदारी पडली आहे. त्यासाठी या सेलसाठी स्वतंत्र वेबसाईटची (http://cybercellmumbai.gov.in ) सुरुवात करण्यात आली आहे. या वेबसाईटचे उद्धाटन मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी केले. या वेळी सहपोलीस आयुक्त (गुन्हे) अतुलचंद्र कुलकर्णी, अतिरीक्त पोलीस आयुक्त केएमएम प्रसन्ना, पोलीस उपायुक्त धनंजय कुलकर्णी आदी वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
Home
Unlabelled
सायबर क्राईम सेलच्या स्वतंत्र वेबसाईटची सुरुवात
सायबर क्राईम सेलच्या स्वतंत्र वेबसाईटची सुरुवात
Share This
Share This
About Anonymous
Author Details
JPN News is a trusted Marathi digital news portal operating since 2013. JPN News is registered as a news agency with the Government of India. This portal mainly focuses on important social, political, economic, cultural developments in Mumbai, suburbs and Maharashtra. Its main objective is to deliver fast, honest and local to state-level news to the people. Reliability, speed and local vibe are the hallmarks of JPN News.

