लेप्टो स्पायरोसिसमुळे सभागृहात सर्व विरोधी पक्ष्यांनी प्रशासनाला धारेवर धरले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

लेप्टो स्पायरोसिसमुळे सभागृहात सर्व विरोधी पक्ष्यांनी प्रशासनाला धारेवर धरले

Share This

मुंबई,(प्रतिनिधी):मुंबईत लेप्टोस्पायरोसीस मुळे आतापर्यंत १६ जणांना आपले प्राण गमवावे लागल्याने  विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेकर  यांनी यावर सभागृहात निवेदन करीत पालिका प्रशासनाला जबाबदार धरीत  धरेवर धरले. त्यावर मनसे गटनेते संदीप देशपांडे यांनी मुंबईतील वाढत्या लोकसंख्येवर अंगुली निर्देश करीत प्रशासनाची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.


देवेंद्र आंबेकर यांनी निवेदन करताना पालिकेच्या शताब्दी रुग्णाल्याच्या गैर सोयीवर टीकास्त्र सोडला. पालिकेकडे २४ वार्डमध्ये केवळ १३७ मुसक संहारक असून त्यांच्याकडेही पुरेसे साहित्य नसल्याचे त्यांनी सांगितले. यावरून पालिकेची आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरली  असून हे पालिकेला लाजीरवाणे आहे.  दरवर्षी पावसाल्यामध्ये साथीचे आजार उदभवतात मात्र यासाठी सुरुवातीपासून प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्यास प्रशासन अपयशी ठरते आणि  निरपराध माणसांचे नाहक बळी जातात असा आरोप आंबेकर यांनी केला.
                   
विरोधी पक्ष नेत्यांच्या भूमिकेला राष्ट्रावादीचे गटनेते धनंजय पिसाळ, समाजवादी पार्टीचे गटनेते रईस शेख यांनीही साथ देत प्रशासनावर हल्लाबोल केला. पिसाळ यांनी तर या मृत्यूला आयुक्त जबाबदार असल्याचा गंभीर आरोप केला.  तर रईस शेख यांनी आपण पाणी भरण्यावर  आजार उद् भवु  शकतात याची कल्पना  प्रशासनाला दिली होती, असे सांगत दत्तक वस्ती योजनाही अकार्यक्षम  असल्याचा  आरोप केला.
                     
भाजपा गटनेते मनोज कोटक यांनी  लेप्टोची समस्या ही गंभीर असून प्रशासनाने यावर उपाययोजना त्वरित करावी असे सांगत हा रोग पसरू नये म्हणून काय मोहीम राबविणार हेही स्पष्ट करावे असे सांगितले. तर स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी सदर रोगाचा प्रादुर्भाव अनधिकृत वस्तीत जास्त प्रमाणात  झाला असल्याचे स्पष्ट करीत मुंबईतील वाढलेल्या अनधिकृत झोपडपट्ट्या, तबेले यांच्यावर कारवाई करण्याची  मागणी करीत त्यांनी विरोधकांना टोला  हाणण्याची संधी साधली. त्याचप्रमाणे अनधिकृत चायनीच गाड्या, खाद्याचे स्टोल यावरील राहिलेले अन्नपदर्थ टाकून दिल्यामुळे उंदरांचा प्रादुर्भाव  वाढण्याचे त्यांनी सांगिले. या विषयावर  अनेक सदस्यांनी आपापली भूमिका मांडत लेप्टो स्पायरोसीसला आला घालण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली.
  मनसे रोख वाढत्या लोंडयाकडे
                     
मनसे गटनेते संदीप देशपांडे  यांनी या विषयावर  आपली भूमिका मांडताना वाढत्या लोकसंख्येवर  बोट ठेवत  सर्व राष्ट्रीय पक्ष्यांनी  मुंबईतील वाढत्या लोंडयावर भूमिका घ्यावी , असे आवाहन केले. तरी मुंबईकरांचे समाधान करू शकत नाही, असे त्यांनी सांगितले. ज्याप्रमाणे रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहेत. त्याप्रमाणात पालिकेची रुग्णाल्ये पुरेशी  आहेत  का असा सवालकरीत पालिका कुठे -कुठे  पुरी पडणार  असे सांगितले. पालिका रुग्णालये  पालिकेच्या करदात्यांसाठी हवीत  अशी मागणी  करती त्यांनी वाढत्य लोंडयावर  लक्ष वेधले.

प्रशासनाकडून सारवासारव                 
आज सभागृहामध्ये लेप्टो स्पायरोसीस च्या मुद्यावरून प्रशासनाला धारेवर धरल्यानंतर अति. आयुक्त संजय देशमुख यांनी आपली बाजू मांडत सारवासारव  प्रयत्न केला. यावर बोलताना ते म्हणाले  हा रोग केवळ उंदरांपासून होत  नसून  इतर प्राण्यांपासून होत असल्याचे त्यांनी सांगितले.  प्रतीबंधक  उपाय योजनेत १,२०,००० उंदरांना पकडून नष्ट केले. मात्र कुत्र्यांवर नसबंदी शिवाय काहीही  करता येत नसल्याची कबुली त्यांनी दिली. तर  ताबेल्यावरील कारवाई बाबत कायदेशीर  पालिका तोडका काढेल असे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे रस्त्यावरील खाद्यपदर्थ गाड्यांवर कारवाई करण्याची मोहीम सुरु आहे. या निवेदनावर महापौर  स्नेहल आंबेकर यांनी समाधान व्यक्त करत प्रत्येक सदस्यांनी आरोग्य शिबीर  करावे असे आवाहन केले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages